काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक ! भारतानं पाकिस्ताननंतर चीनला ‘ठासून ‘सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या परराष्ट्र मंत्र्याने संयुक्त राष्ट्र संघात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी भारताच्या बाजूने योग्य शब्दात चीनला सणसणीत उत्तर दिले. रवीश कुमार म्हणाले, “जम्मू-काश्मीर आणि लडाखबद्दल चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या टीकेबद्दल आम्हाला माहिती मिळाली. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत, हे चीनला चांगले ठाऊक आहे.” ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की इतर देश भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करतील. रवीश कुमार यांनी पीओकेमधील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (CPEC) ला बेकायदेशीर देखील म्हटले आहे.

काय म्हटले होते चिनी मंत्री :
दरम्यान, चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रामध्ये उपस्थित केला होता. ते म्हणाले होते की, “काश्मीर हा मुद्दा हा भूतकाळातील वाद आहे आणि तो संयुक्त राष्ट्रांच्या सनद, संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ठरावांनुसार आणि द्विपक्षीय करारांनुसार निष्पक्ष आणि शांततेने सोडविला गेला पाहिजे. स्थिती बदलल्यामुळे कोणतीही कारवाई केली जाऊ नये.” या  पुढे ते म्हणाले, “भारत आणि पाकिस्तान या दोहोंचा एक शेजारी म्हणून, चीनने आशा व्यक्त केली आहे की दोन्ही बाजूंमधील वादावर व्यवस्थित तोडगा निघाला पाहिजे आणि संबंधांमधील स्थिरता पूर्ववत झाली पाहिजे.”

अमेरिकेचा पाक आणि चीनला इशारा :
काश्मीरबाबाबत भारताने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान काश्मीर प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. यावेळी UNGA मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला सुनावत धक्का दिला होता पण चीनलाही इशारा देत लक्ष्य केले. शुक्रवारी संयुक्त राष्ट्र संघात अमेरिकेने पाकिस्तानला विचारले होते की तुम्हाला फक्त काश्मीरमधील मुस्लिमांचीच चिंता का आहे आणि चीनच्या मुसलमानांची चिंता का नाही ?

Visit : Policenama.com