काश्मीर : मलेशिया आणि तुर्कीला भारताचा इशारा ; म्हटले आपले संबंध मैत्रीपूर्ण, ‘बोलण्यापूर्वी वास्तव जाणून घ्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये (UNGA) काश्मीर प्रश्नावर तुर्की आणि मलेशियाने केलेल्या टिपण्णीवर भारताने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि दोन्ही देशांच्या वक्तव्यांना पक्षपाती म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान आणि मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि बोलण्यापूर्वी वास्तवाकडे लक्ष देण्याचा आणि परिस्थिती समजून घेण्याचा सल्ला दिला.

या दोन्ही नेत्यांनी काश्मीर प्रश्नातील वास्तवता जाणून घेतल्याशिवाय ही टीका केली होती आणि त्यांनी पुढे अशी टीका करण्यास टाळावे अशी टीका रविश कुमार यांनी केली.

मलेशियन पंतप्रधान काय म्हणाले होते :
गेल्या महिन्यात, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७४ व्या अधिवेशनात मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांनी आपल्या संबोधनात म्हटले होते की जम्मू-काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र संघटनेने ठराव केलेला असूनही, या प्रदेशावर हल्ला करून त्याच्यावर कब्जा केला. असे करण्याची कारणे असू शकतात परंतु तरीही ते चुकीचे आहे. ते पुढे म्हणाले की, भारताने पाकिस्तानबरोबर एकत्र काम केले पाहिजे आणि ही समस्या सोडविली पाहिजे.

मलेशियाच्या भूमिकेचा निषेध करत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की जम्मू-काश्मीरनेही इतर सर्व राज्यांप्रमाणेच भारतामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. तर पाकिस्तानने मात्र राज्याच्या एका भागावर हल्ला केला आणि बेकायदेशीरपणे कब्जा केला. मलेशिया सरकारने दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध डोळ्यासमोर ठेवून असे भाष्य करणे टाळावे.

मलेशियाप्रमाणे तुर्कीचे राष्ट्रपती म्हणाले की जम्मू-काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र संघटनेने ठराव करूनही आठ लाख लोक तुरुंगात आहेत. तुर्कीबद्दल रवीशकुमार म्हणाले की, आम्ही तुर्की सरकारला या विषयावर पुढे कोणतेही विधान करण्यापूर्वी वास्तव योग्य प्रकारे समजून घेण्याची विनंती करतो. ही पूर्णपणे भारताची अंतर्गत बाब आहे, यात हस्तक्षेप करू नये.

visit : Policenama.com