काश्मीर : अनंतनाग मध्ये जवान – दहशतवाद्यात चकमक सुरु

श्रीनगर : वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. परिसरात सध्या चकमक सुरू आहे.

[amazon_link asins=’B07D9DQQTM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’02f392c4-8fc0-11e8-91d4-ff0066828271′]

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जम्मू काश्मीर पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफ यांनी बुधवारी सकाळपासूनच हे सर्च आॅपरेशन सुरु केले आहे. अनंतनागच्या लाल चौक परिसरात राहणाºया लोकांनी पहाटे ४ वाजता बॉम्ब आणि गोळीबाराचा आवाज ऐकल्याची माहिती दिली.  त्यानंतर भारतीय जवानांनी हा परिसर घेरला आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळेसाठी या परिसरात ये-जा करण्यासही मनाई करण्यात आली आहे. श्रीनगरच्या बनिहालकडे जाणारी रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे. तसेच भागातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. लपलेले दोन ते तीन दहशतवादी असल्याची  शक्यता व्यक्त केली जात आहे.

याआधीही जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला होता. यामध्ये एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहे.