काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत 3 अतिरेकी ठार; 10 लाखांचे बक्षीस असलेला मुदासिर पंडित ‘ढेर’

श्रीनगर : वृत्त संस्था – उत्तर काश्मीर ( North Kashmir) मधील सोपोर परिसरातील गुंड ब्रथ भागात रविवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन अतिरेक्यांना ठार करण्यात यश आले आहे. लष्कर ए तैयबा (Lashkar-e-Taiba) चे टॉप अतिरेक्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

सोपोर परिसरात अतिरेकी शिरल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दला (Security Forces) ने या परिसरात सर्च सुरु केला. त्यावेळी अतिरेक्यां (Terrorist ) नी पळून जाण्यासाठी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली.
त्याला सुरक्षा दलाने गोळीबाराने प्रतिउत्तर दिले. सुरुवातीला एक अतिरेकी चकमकीत मारला गेला. त्यानंतर आणखी इतर दोन अतिरेकी ठार झाले.


आई जीपी कश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, लष्कर ए तैयबाचा टॉप अतिरेकी मुदासिर पंडित याचा तीन पोलीस कर्मचारी, दोन लोकप्रतिनिधी आणि दोन नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी होता.
मुदासिर विरुद्ध १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

या अगोदर शनिवारी जम्मू काश्मीर पोलिसांनी बारामुल्लामध्ये नार्को टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला. पोलिसांनी १२ जणांना अटक केली,
असून त्यांच्याकडून हेरॉईनची ११ पाकिटे, १० ग्रेनेड, ४ पिस्तुल आणि काडतुसे तसेच २१ लाख ५० हजार रुपयांची रोकड व १ लाख रुपयांचा चेक हस्तगत करण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : 3 militants killed in clashes with security forces in Kashmir

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट

PM Kisan Sanman Nidhi | 30 जूनपूर्वी रजिस्ट्रेशन केल्यास 4,000 रुपये मिळवण्याची संधी, जाणून घ्या कसे

Pune Crime Branch | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; गुन्हे शाखेच्या युनिट-2 ची कामगिरी

Diagnosis of Covid-19 | कोरोना रूग्णाच्या मृत्यूला कधीपर्यंत नाही मानलं जाणार ‘कोविड-डेथ’, सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारनं सांगितलं; जाणून घ्या

Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’