जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याची मोठी कामगिरी, अनंतनागमध्ये 3 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमध्ये अनंतनागमधील बिजबेहरामध्ये बुधवारी सुरक्षारक्षकांनी मोठे यश मिळवले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून सुरु असलेल्या चकमकीमध्ये सुरक्षारक्षकांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे दहशतवादी एका घरामध्ये लपून बसले होते. विशेष म्हणजे या चकमकी दरम्यान आपल्या लष्कराला काहीच हानी पोहचली नाही.

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यामधील ही तिसरी मोठी चकमक आहे. या आधी 29 सप्टेंबरला दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

29 सप्टेंबर रोजी सुरक्षारक्षकांना एका घरामध्ये 3 दहशवादी असल्याचे वृत्त मिळाले होते तेव्हा ही चकमक सुरु झाली. सुरक्षारक्षकांनी रामबन बटोत येथे हिजबुल कमांडर ओसामाला यमसदनी धाडले. या चकमकीत जाहिद आणि फारुक सुद्धा मारले गेले आणि बंदी बनवलेल्या लोकांना सुरक्षित पद्दतीने वाचवण्यात आले.

ओसामाने नोव्हेंबर महिन्यात बीजेपी नेता अनिल परिहार आणि अजित परिहारची हत्या केली होती. तेव्हापासून ओसामावर लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. कलम 370 हटवल्यानंतर दहशतवाद्यांच्या चकमकींची संख्या कमी झालेली आहे. सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी गस्तीचे प्रमाण वाढवले आहे. पोलिसांच्या मते दशतवाद्यांकडे सध्या हत्यारांची कमतरता आहे त्यामुळे ते सध्या सुरक्षारक्षकांकडून हत्यारे चोरी करत आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी