‘द्रास कोठे आहे, माहीत आहे का’ ?, NSA अजित डोवाल यांची अनंतनागला भेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवल्यानंतर त्याचे विभाजन होऊन केंद्र शासित प्रदेशात रुपांतरीत करण्यात आले आहे. तेथील परिस्थितीवर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जम्मू काश्मिर मध्ये आहेत. जेव्हापासून कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मिरचे विभाजन केले गेले तेव्हापासून ते तेथेच आहेत. शनिवारी त्यांनी दहशतवाद्यांचे केंद्र असणाऱ्या अनंतनाग येथे भेट दिली. तेथील त्यांचा एक व्हीडिओ समोर आला आहे. यात ते बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक नागरिक आणि पशू व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करताना दिसत आहेत.

अजित डोवल हे ६ ऑगस्टपासून जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. तेथील परिस्थितीवर त्यांची करडी नजर आहे, आतापर्यंत ते श्रीनगरमध्ये राहत होते. परिसरात होते, तेथेही त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. दहशतवाद्यांचे केंद्र असणाऱ्या अनंतनागमध्ये त्यांनी भेट दिली. तेथील पशू व्यापाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. या बाजारामध्ये प्रामुख्याने बोकडांची विक्री होते. त्यांच्याबरोबर चर्चा करताना, बोकडांचा दर, वजन आणि खुराक यांची विचारणा केली.

तसंच एका तरुण मुलाशीही बोलले. बोकड कारगिल जिल्ह्यातील द्रासमधून आणल्याचे सांगतानाच, ‘द्रास कोठे आहे, तुम्हाला माहीत आहे का, असा प्रश्न त्या मुलाने केला तर त्यावर डोवाल यांच्या सोबत असणाऱ्या अनंतनागचे उपायुक्त खालिद जनागिर यांनी त्याला उत्तर दिले. तू ज्यांच्याशी बोलत आहे, ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. त्यानंतर डोवाल यांनी त्या तरुणाच्या पाठीवर थाप मारली आणि हसत पुढे गेले, असा हा व्हीडिओ आहे.

आरोग्यविषयक वृत्त –