घरच्यांच्या विरोधाला झुगारत ती बनली पहिली महिला वैमानिक 

श्रीनगर : वृत्तसंस्था 

नेहमीच, वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या काश्मीर या वेळी वेगळ्याच कारणाने प्रसिध्दीत आले आहे. आपल्या घरच्यांच्या विरोधाला झुगारत एक ३० वर्षीय तरुणीने काश्मिरची पहीली महिला पायलट होण्याचा मान पटकावला आहे. इरम हबीब असे ह्या महिला पायलट नाव आहे. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणुन रुज होणार आहे.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf1abbe9-adbd-11e8-8ba2-91f306f93f20′]

लहानपणा पासुनच, तिला पायलट बनायचे होते. यासाठी तिने फॉरेस्ट्री डॉक्टरेटचा अभ्यास सोडुन वैमानिक होणं निवडलं. इमरच्या वडिलांचा सरकारी रुग्नालयांना वैद्यकीय उपकरणं पुरवण्याचा व्यवसाय आहे. ज्यावेळी इरम बारावीत होती त्यावेळीच तिनं वैमानिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु तिच्या घरच्यांचा त्याला साफ विरोध केला होता.

काश्मीरमध्ये कधी कुठल्या मुलीनं वैमानिक झाली आहे का? असे म्हणत विरोध केला. मात्र तिनं सहा वर्ष घरच्यांना पाठिंबा देण्याची गळ घातली व आपल स्वप्नपुर्ण केले.

पुणे : हिंजवडीतून ५६ कंपन्यांनी स्थलांतर केल्याची चर्चा

व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवण्यासाठी इरम सध्या दिल्लीत प्रशिक्षण घेत आहे. याआधी तिने मयामी येथे ही प्रशिक्षण घेतले.