कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपी नार्कोसाठी तयार

कठुआ : वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपी नार्को टेस्टसाठी तयार असल्याची माहिती आरोपीचे वकील अंकुर शर्मा यांनी दिली आहे. आज या प्रकरणाची पहिली सुनावणी कठुआच्या न्यायालयात झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व आरोपींना आरोपपत्राच्या प्रती देण्यात आल्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे.

या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम वादाचे वळण लागले आहे. हा वाद टाळण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने सरकारी वकील म्हणून दोन शीख वकिलांची नियुक्ती केली आहे. हे वकील कोर्टात पोलिसांची बाजू मांडतील.
दरम्यान मुख्य आरोपी असलेल्या संजी राम याच्या मुलीने म्हटले आहे की, बलात्कार झालाच नाही तिची हत्या झाली आहे , या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा असेही तिने म्हटले आहे.

संबंधित घडामोडी:

कठुआ सामूहिक बलात्कार : आसिफाच्या कुटुंबीयांनी घर सोडले
कठुआ प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
पुण्यात आसिफाच्या न्यायासाठी कॅण्डल मार्च
कठुआ प्रकरण : वकिलाच्या जीवाला धोका
तर मी जल्लादची नोकरी स्वीकारेन : आनंद महिंद्रा
आसिफाच्या न्यायासाठी रविवारी कोल्हापुरात कॅण्डल मार्च
कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर चार महिन्यानंतर गुन्हा दाखल