पुण्यात घडलेल्या दुर्दुेवी घटनेचे ‘पडसाद’ बिहारच्या कटिहारमध्ये, मयतांना प्रत्येकी 4 लाखांची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील कोंढवा परिसरात एका सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्घटना कोंढवा भागातील तालव मस्जिद परिसरात घडली. जेथे ६० फूट उंच भिंत सकाळी अचानक भिंतीच्या मागील भागात असलेल्या पत्र्यांच्या झोपड्यावर कोसळली.

मृतक बिहारच्या कटिहारमधील राहिवासी
या भीषण दुर्घटनेत ४ लहान मुलांसह १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तरीही या दुर्घटनेत मातीच्या ढिगाऱ्या खाली आणखी काही लोक अडकून बसल्याची शक्यता आहे. तर पुणे पोलिसांकडून १५ लोक मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले आहे. अजूनही मदत कार्य सुरु आहे. यात मृतकांमध्ये जास्त करुन बिहारमधील कटिहार या ठिकाणावरील लोकांचा समावेश आहे. मृत लोकांमध्ये १५ कटिहारच्या बलरामपूर क्षेत्रातील बघार गावचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. कटिहार जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबतचे स्पष्टीकरण दिले की या सर्व मृतांमधील लोक बलरामपूर मधील बघार गावचे आहेत.

मृतामध्ये एका महिलेचा समावेश
दुर्घनेची बातमी मिळताच या गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. मृत झालेले हे सर्व मजूर कंस्ट्रक्शनचे काम करतात. ज्या भागात ही दुर्घटना घटली त्या भागात बिहार आणि बंगालमधील मजूर राहतात. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतकांमध्ये ९ पुरुषांचा, १ महिलेचा आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे.

४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा
मातीच्या ढिगाऱ्या खालून आतापर्यंत ४ लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहे. अजूनही काही लोक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एनडीआरएफचे मदत कार्य सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाची आदेश दिले आहेत. तर मृतकांच्या कुटूंबांना एनडीआरएफने ४ – ४ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

You might also like