Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरी लगतच्या जागेवरील क्रिडांगणाचे आरक्षण हटविण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपुर्वी होणार!

हरकती व सूचनांवरील सुनावणीचा अहवाल तातडीने तयार करण्यासाठी महापालिकेत लगबग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Katraj Dairy Playgrounds Reservation | कात्रज डेअरी लगतच्या जागेवरील क्रिडांगणाचे आरक्षण उठविण्यासाठी महापालिकेच्यावतीने मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांवर दोन दिवसांपुर्वी शहर अभियंता कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) आचारसंहितेपुर्वी सुनावणीचा अहवाल राज्य सरकारकडे (Maharashtra Govt) पाठविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. तसेच आचारसंहितेपुर्वीच राज्य शासनाच्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये त्यावर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये कात्रज डेअरी लगतच्या सुमारे सात एकर जागेवर क्रिडांगणाचे आरक्षण आहे. हे आरक्षण उठवून या जागेवर डेअरी व प्रक्रिया प्रकल्पाचे आरक्षण टाकून प्राधीकरण म्हणून पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची नियुक्ती करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने आरक्षण बदलासाठी हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. त्यावर दोन दिवसांपुर्वी शहर अभियंता कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. मनसेचे स्थानीक नगरसेवक वसंत मोरे (Vasant MOre), शहर कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या सुमारे ८५० नागरिकांनी येथील क्रीडांगणाचे आरक्षण उठवू नये, अशी मागणी केली आहे. कात्रज परिसराची लोकसंख्या तीन लाखांच्यावर असून येथे मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने नाहीत. अशा परिस्थितीत हे आरक्षण उठविल्यास पुढील पिढीचे आरोग्य धोक्यात येईल, अशी भिती व्यक्त केली आहे.(Katraj Dairy Playgrounds Reservation)

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ, येथील कामगार संघटना आणि डेअरीच्या घटक संस्थांनी कात्रज डेअरीचे एक लाखांहून
अधिक सदस्य आहेत. हे सर्व जिल्हयातील शेतकरी आहेत. शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी कात्रज डेअरी हा महत्वाचा घटक आहे.
शासनाने डेअरीला दिलेल्या जागेवरच महापालिकेने चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकले आहे.
ही चूक दुरूस्त करण्यासाठी आरक्षण उठवू नये, अशी मागणी केली आहे. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने पुन्हा हरकती
व सूचना मांडण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या सुनावणीचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे.
पुढील आठवड्यात तो राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपुर्वी मंत्रीमंडळामध्ये त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
विशेष असे की, क्रिडांगणाचे आरक्षण उठविण्याचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच पाठविल्याने मंत्री मंडळामध्ये आरक्षण उठविण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | बोपोडी चौक वाहतूक आठवडाभरात मार्गी लागेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Pulse Polio Vaccination | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पूर्वीचा डोस अवश्य द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

Maratha Protesters In Solapur | संतप्त मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला गावातून परत पाठवले