सहा पदरी कात्रज देहूरोड बायपास रस्त्याला निधी मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीला कंटाळून कात्रजवरून बाह्यवाहतूक वळण मार्ग काढण्यात आला आहे. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६.७७ कोटी व कात्रज चौकातील पूलासाठी १२६.६९ कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी मंजूर करण्यात आला आहे.

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी होत होती. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत पार्किंग व अधिक अनधिकृत दुकाने यामुळे महामार्ग रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला होता त्यामुळे अपघाताची संख्या वाढत होती. बऱ्याच वेळा प्रशासनाला दुरुस्तीसाठी सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात होते.परंतु, या मार्गाचे सहा पदरी करणामुळे रस्ता रुंद सुरू होऊन महामार्ग वाहतुकीस योग्य ठरेल या महामार्गावरील गरजेनुसार रस्ते किंवा भुयारी मार्ग तयार केले .मात्र, त्यानंतर या रस्त्याचा विकास किंवा रुंदीकरण किंवा भुयारी मार्गाची निर्मिती न केल्याने वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले होते.

विशेष म्हणजे, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, 3.88 किलोमीटर लांबीच्या कात्रज ते वडगाव नवले ब्रीज सहापदरी रस्त्याच्या कामासाठी 96.77 कोटी व कात्रज चौकातील फ्लाय ओव्हर उभारणीसाठी 126.69 कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याने काही दिवसात या वाहतूक कोंडीतून सुटका होणार हे निश्चित झाले आहे.

इतकेच नव्हे तर, कात्रज ते नवले पूल या बायपास महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरण तसेच दोन्ही बाजूने दोन पदरी सेवा रस्त्याचे तसेच आंबेगाव शिवसृष्टी आणि दत्तनगर येथील भुयारी मार्गाचे रुंदीकरण, तसेच दोन पादचारी मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही दिवसात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होईल. असे महामार्ग प्रशासनाचे अधिकारी गणेश चौरे यांनी म्हंटले. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या सततच्या पाठपुरव्यामुळे या महामार्गाच्या निधी उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे

Loading...
You might also like