Katraj Kondhwa Flyover | नितिन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होउन 9 महिने झाले, परंतू कात्रज येथील वंडरसिटी ते राजस सोसायटी दरम्यानच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवातच नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Katraj Kondhwa Flyover | देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्गावरील वंडरसिटी ते सातारा रस्ता ओलांडून कात्रज – कोंढवा रस्त्यावरील राजस सोसायटी चौकापर्यंतच्या नियोजित उड्डाणपुलाचे भुमिपूजन होउन ९ महिने होत आले तरी अद्याप या पुलाचे काम सुरू झालेले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण (एनएचआय) हे या उड्डाणपुलाचे काम करणार आहे. (Katraj Kondhwa Flyover)

 

सातारा रस्त्यावरील कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी एनएचआयच्या माध्यमातून वंडरसिटी ते कात्रज- कोंढवा बाह्यवळण मार्गावरील राजस सोसायटी चौकापर्यंत उड्डाणपुल बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उड्डाणपुलासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारातही उड्डाणपुलाचा पिलर उभारण्यात येणार आहे. या उड्डाणपुलामुळे देहूरोड बाह्यवळण रस्त्याने सोलापूरकडे जाणार्‍या जड वाहनांसोबत अन्य वाहनांनाही कात्रज कोंढवा रस्त्याकडे जाणे सोयीस्कर होणार आहे. यामुळे कात्रज चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार असून पुणे सातारा रस्त्यावरील वाहनांची देखिल कोंडीतून सुटका होणार आहे. (Katraj Kondhwa Flyover)

 

एनएचआयच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या या कामासाठी राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये पिलर उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देखिल परवानगी दिली आहे. या कामाचे भुमीपजून मागील वर्षी २४ सप्टेंबरला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यानंतर आतापर्यंत फक्त राजस सोसायटी चौकामध्ये कोअर घेण्यात आला. तसेच प्राणी संग्रहालयालगत कोअर घेण्यात आला. कात्रज चौकातून पुलाखालून राजस सोसायटीकडे जाणारा रस्ता बॅरीकेड लावून बंद करण्यात आला आहे. मात्र, यानंतर काम बंदच आहे.

यासंदर्भात एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी धनंजय देशपांडे यांच्यासोबत संपर्क साधला असता, ते म्हणाले या कामांसंदर्भात तांत्रिक काम सुरू असून लवकरच पुलाचे काम सुरू करण्यात येईल.

 

भूसंपादना अभावी कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम ठप्प
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावेळी भविष्यातील गरज ओळखून कात्रज- कोंढवा रस्त्यावर दुमजली उड्डाणपुल उभारण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत,
असेही सूचित केले होते. परंतू या मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियाच जवळपास ठप्प झाल्याने काम थांबले आहे.
नुकतेच महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. तसेच या रस्त्यावर ज्याठिकाणी खड्डे होते,
तेथे डांबरीकरण केल्याने तूर्तास तरी कात्रज- कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम होणार नाही, अशी चिन्हे दिसत आहे.
तसेच उड्डाणपुलाचे काम झाले तरी कात्रज चौकातील वाहतूक कोंडी भविष्यात राजस सोसायटी चौकामध्ये अनुभवायला मिळेल, अशी चिन्हे आहेत.

 

Web Title :- Katraj Kondhwa Flyover | It has been 9 months since the ground breaking ceremony at the hands of Nitin Gadkari but work on the flyover between Wonder City and Rajas Society at Katraj has not started yet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Trap On Police Sub Inspector | आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

Pradip Bhide Passes Away | दूरदर्शनचा चेहरा ‘हरपला’ ! सुप्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे याचं 65 व्या वर्षी निधन

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या