Katraj – Kondhwa Road | कात्रज कोंढवा रस्त्यावरील पथदिव्यांचा ‘रात्रीस खेळ चाले’; अपघातांची दाट शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Katraj- Kondhwa Road | कात्रज- कोंढवा रस्त्यावरील पथदिवे फक्त नावाला लावलेले आले असून, हे दिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. अत्याधुनिक म्हणून लावण्यात आलेल्या या दिव्यांचा रात्रीच्या वेळी काहीच उपयोग होत नसल्याचे समोर येत आहे. आधीच कात्रज – कोंढवा रस्ता (Katraj- Kondhwa Road) हा अरूंद असल्याने बरेचदा तिथे वाहतूक कोंडी झालेली आढळते. रात्रीच्या वेळी योग्य प्रकाश नसल्याने अपघात होण्याची शक्यता जास्त आहे.

कात्रज – कोंढवा रस्त्यावर अनेक अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामध्येच आता प्रशासनाने कात्रज चौक ते माउलीनगर या उड्डाणपुलाचे (Katraj Chowk to MauliNagar Flyover) काम हाती घेतले आहे. तसेच इस्कॉन मंदिर (ISKCON Temple) रस्त्यावरील खोदकाम चालू आहे. यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय होत असून याठिकाणी मार्गावर ठिकठिकाणी पथदिवे (Street Lights) चालू असणे गरजेचे आहे. मात्र बहुतांश ठिकाणचे पथदिवे लुकलुक करतात. कात्रजवरून कोंढव्याकडे जाणाऱ्या उड्डाण पूलावरील दिवे बंद आहे. तसेच माऊलीनगर येथून कोंढव्याकडे जाताना डाव्या बाजूला रस्त्यावर काहीच प्रकाश पडत नाही. प्रशासनाच्या अशा दुर्लक्षित कारभारामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच उंड्री (Undri), आबनावेनगर (Abnavenagar), मोहननगर (Mohannagar), पिसोळी (Pisoli),
हांडेवाडी (Handewadi) बहुतांश भागात पथदिवे बंद आहेत. त्यामुळे डिव्हायडर (Divider) आहेत हे सुद्धा लक्षात
येत नाहीत. ध्रुव ग्लोबल स्कूलसमोरील Dhruv Global School) मधोमध असलेल्या खांबावरील पथदिवे बंद आहेत. खडीमशिन चौकाच्या (Khadimachine Chowk) पुढे गेल्यावर सुद्धा अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. अवजड वाहने सुसाट धावत असल्याने दुचाकी व पादचारी (Pedestrian) लोकांच्या जीवाला धोका असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. (Katraj- Kondhwa Road)

Web Title :   Katraj – Kondhwa Road | Katraj Kondhwa Street Street Lights ‘Nightly Play’; High chance of accidents

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘…तर नाना पटोले लादेनला भेटले होते’, पटोलेंच्या ‘त्या’ आरोपींवर फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Sameer Wankhede | समीर वानखेडेंना उच्चन्यायालयाचा दिलासा, ‘या’ दोन अटींवर अटक न करण्याचे CBI ला निर्देश

Maharashtra Politics News | ‘…त्यामुळे यांना जोड्याने मारले पाहिजे, बाळासाहेबांनी तुम्हाला हे शिकवले का?’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल