Katraj Kondhwa Road Pune | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला तूर्तास ‘ब्रेक’ ! सध्या अस्तित्वातील रस्त्याचे डांबरीकरण होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बहुचर्चित कात्रज – कोंढवा रस्ता (Katraj Kondhwa Road Pune ) रुंदीकरणाचे काम भूसंपादनाअभावी (Land acquisition) तूर्तास तरी होणे शक्य नाही असे संकेत महापालिका प्रशासनाकडून (Pune Corporation) मिळत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी (municipal commissioner vikram kumar) आहे त्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, येवलेवाडी ते कोंढव्या (yewalewadi to kondhwa) दरम्यानच्या अस्तित्वातील रस्ता कॉंक्रीटचा करणे आणि काकडे वस्ती ते कोंढवा (kakde vasti to kondhwa) रस्त्यादरम्यानचा आहे त्या रस्त्याचे डांबरीकरण करणे यासाठी महापालिका आयुक्तांनीच कात्रज- कोंढवा रस्त्याच्या (Katraj Kondhwa Road Pune) कामासाठी अंदाजपत्रकातील ३५ कोटी रुपये तरतुदीपैकी ९ कोटी ७६ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे (pmc standing committee) ठेवला होता. स्थायी समितीने तो मान्य केला आहे.

 

कात्रज – कोंढवा रस्त्याचे राजस सोसायटी चौक ते कोंढवा खडी मशिनपर्यंत (rajas society katraj to kondhwa khadi machine chowk) ८४ मी. रुंदीकरणाच्या कामाला २०१८ मध्ये मान्यता देण्यात आली. त्यानुसार या रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले.
परंतू अल्पावधीतच काही जागा मालकांनी भूसंपादनासाठी टीडीआरचा (TDR) प्रस्ताव नाकारत रोखीने मोबदला मागितला.
त्यामुळे भूसंपादन होण्याची प्रक्रिया तूर्तास बंदच झाली आहे.
आतापर्यंत जेमतेम २५ टक्के काम झाले असून उर्वरीत काम होण्यास अनिश्‍चित कालावधी लागण्याची शक्यता आहे.
मागील तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू झाल्याने रस्ता दुरूस्तीही करण्यात येत नाही.
मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक असल्याने रस्ता खड्डेमय झाला आहे. यावर सातत्याने अपघात होत असून अनेकांचे बळी जात आहेत.
तसेच अनेकजण जायबंदीही होत आहेत. या रस्त्याची डागडुजी करून आहे त्या रस्त्याचे डांबरीकरण करावे.
अशी मागणी स्थानीक लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत होती.
यामुळे प्रशासनाने सध्या अस्तित्वातील कात्रज-कोंढवा रस्त्याचे (Katraj Kondhwa Road Pune) डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ४ कोटी ९० लाख रुपये खर्च येणार आहे.

यासोबतच कोंढवा येथून येवलेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात येणार आहे.
हे काम करण्यासाठी सध्याचा रस्ता बंद ठेवावा लागणार असल्याने येथील सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व्हिस रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी ३ कोटी ५६ लाख रुपये खर्च येणार आहे. विकास आराखड्यामध्ये हा सर्व्हिस रस्ता २४ मी. रुंद असून सध्या जागेवर ७ ते ८ मी.च आहे.
या रस्त्यावरील काही जागा ताब्यात आल्या असून त्याठिकाणी २४ मी. रुंदीनुसार विकसन करणे शक्य होणार आहे.
यासोबतच गंगाधाम येथून शत्रुंजय मंदिर येथे कात्रज-कोंढवा रस्त्याला (Katraj Kondhwa Road Pune)
जोडणार्‍या २४ मी. रस्त्याचे काकडे वस्तीजवळ सुमारे ६०० मी. रस्त्याचे काम रखडले आहे. भूसंपादनातील अडचणींमुळेच हे काम रखडले असून सध्या चिंचोळा आणि कच्चा रस्ता आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण केल्यास येथील वाहतुकीलाही गती मिळणार आहे.
यासाठी सध्या अस्तित्वातील १२ मी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
या तीनही कामांसाठी ९ कोटी ७६ लाख रुपये निधी लागणार आहे.

 

हा निधी कात्रज- कोंढवा रस्त्यासाठी चालू अंदाजपत्रकातील ३५ कोटी रुपयांच्या तरतुदीतून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

 

Web Title : Katraj Kondhwa Road Pune | Katraj-Kondhwa road widening work break immediately! The existing road will be asphalted

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Independence Movement | दिवाळीनिमित्त ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले सोने-चांदीचे नाणे

Business Idea | गाव असो की घर ! कुठूनही सुरू करू शकता ‘हा’ बिझनेस, घरबसल्या होईल लाखो रुपयांची ‘कमाई’

Indian Currency | दिवाळीच्या निमित्ताने 1, 5 आणि 10 रुपयांची ‘ही’ नोट बनवू शकते तुम्हाला मालामाल, जाणून घ्या कसे