Katraj Pune Crime News | पुणे : हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाख खंडणी घेणाऱ्या नमस्कार प्रतिष्ठानचा अध्यक्ष निखील शिंदे आणि सिद्धार्थ रणपिसेला अटक

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Katraj Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Department Pune) , तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collector Office) तक्रार देण्याची धमकी देऊन कात्रज भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून पाच लाखांची खंडणी उकळणाऱ्या (Extortion Case) दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police Station) बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार मे 2024 ते 13 जून 2024 या कालावधीत कात्रज भागात घडला आहे.

याबाबत विश्वनाथ पद्मनाभ पुजारी (वय-57 रा. अमित अस्टोनिया रॉयल, आंबेगाव-नऱ्हे रोड, कात्रज) यांनी गुरुवारी (दि.13) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नमस्कार प्रतिष्ठानचा (Namaskar Pratishthan) अध्यक्ष निखील सुनिल शिंदे Nikhil Sunil Shinde (वय-30), सिद्धार्थ राहूल रणपिसे Siddharth Rahul Ranpise (वय-28 दोघे रा. समता सोसायटी, सहकारनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 384, 385, 386, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Katraj Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कात्रज परिसरात जंक्शन बार आहे.
आरोपी शिंदे आणि रणणपिसे कात्रज चौक परिसरातील रस्टोरंट आणि बार चालकांना भेटले.
तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहात. हॉटेलला पार्किंग व्यवस्था नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देणार असल्याची धमकी दिली.

फिर्यादी पुजारी यांच्यासह कात्रज भागातील हॉटेल, बारचालकांना धमकावून प्रत्येकी दोन लाख रुपये खंडणी आरोपींनी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांच्यासह इतर हॉटेल चालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुजारी यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी घेणाऱ्या शिंदे व रणपिसे यांना पोलिसांनी सापळा रचून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पुढील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alibag – Pune Crime News | अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पुण्यातील तरुणाचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू

Aundh Pune Crime News | पुणे: लिलावात स्वस्तात गाडी देण्याच्या बहाण्याने साडे 9 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

Nilesh Lanke-Gajanan Marne | नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेत स्वीकारला सत्कार (Video)