अॅक्टींगमध्ये करिअर सुरु करणाऱ्या बहिण इसाबेलला कॅटरीना कैफने दिला ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सलमान खान, कॅटरीना कैफ आणि दिशा पाटनी स्टारर भारत हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत सुरुवात केली आहे. यापूर्वी कॅटरीनाने काम केलेले झिरो आणि ठग्ज ऑफ हिंदुस्तान हे सिनेमे म्हणावे तसे चालले नव्हते. परंतु सलमान कॅटरीनाचा भारत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

सिनेमा हिट होवो किंवा फ्लॉप तरीही कॅटरीनाच्या स्टारडममुळे निर्माते तिला सिनेमात घ्यायला इच्छुक असतात. आता कॅटरीना कैफ आपली बहिण इसाबेललादेखील बॉलिवूडसाठी ट्रेनिंग देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशी माहिती समोर येत आहे की, इसाबेल कैफ सुरज पांचोलीसोबत एका डान्सवर आधारीत सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

जेव्हा कॅटला विचारण्यात आले की, तिने इसाबेलला काय सल्ला दिला तेव्हा यावर बोलताना कॅट म्हणाली, “सुरुवातीला जेव्हा इसाबेलने हा सिनेमा साईन केला तेव्हा तिला ती प्रत्येक गोष्ट करण्यास सांगितली होती जी की, मी करत होते. याशिवाय मी तिला नेहमीच सल्ला देत आले की, तिला काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं. शिवाय तिला आता इंडस्ट्रीत एका वर्षापेक्षा जास्त वेळ पूर्ण होत आहे. तर एक बहिण या नात्याने मी तिला सर्वाधिक मदत तेव्हाच करू शकते जेव्हा मी तिला स्वत:चा आवाज परखायला संधी देईन, तेही तिच्यावर कोणताही दबाव न टाकता. मी तिला अशा व्यक्तिमत्त्वात अजिबात बदलू इच्छित नाही. जी बॉलिवूड इंडस्ट्रीत फिट होईल, तर मी तिला एक माणूस म्हणून पुढे जाताना पाहू इच्छित आहे जी स्वत:चा रस्ता शोधेल.”