Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | तुम्ही सुद्धा पाहू शकता कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलचा विवाह, परंतु… जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विक्की कौशल आणि कॅटरिना कैफच्या विवाहाबाबत (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding) जबरदस्त बज आहे. दोघे उद्या 7 फेरे घेऊन बॉलीवुडचे नवीन पावर कपल बनतील. संगीत आणि मेहंदीच्या फंक्शनच्या नंतर आज होणार्‍या वधू-वरांना हळद लागली आहे. लग्नाच्या अगोदर होणार्‍या फंक्शनची छायाचित्रे आणि व्हिडिओज पाहण्यासाठी फॅन्स खुप उत्सुक आहेत. (Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding)

 

प्रक्षेपणाच्या हक्कांसाठी मोठा करार
परंतु, विवाह ठिकाणाहून एकही छायाचित्र समोर येत नसल्याचे दिसत आहे. या पाठीमागे एक मोठे कारण असल्याचे वृत आहे. विक्की आणि कॅटरिनाच्या विवाहाचे टेलिकास्ट ओटीटी (Katrina-Vicky wedding will be telecast on OTT) वर होईल. यासाठी एक मोठा करार सुद्धा झाला आहे.

 

OTT प्लॅटफॉर्मवरून विक्की आणि कॅटरिनाचा विवाह
विक्की कौशल आणि कॅटरीना कैफचा विवाह सोहळा तुम्हाला सुद्धा पाहायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. संगीत, मेहंदी, हळद, वरात, फेरे सर्व तुम्ही सुद्धा पाहू शकता.

विवाहाच्या गुप्ततेची ही आहेत कारणे
विक्की आणि कॅटरीनाकडे चाहत्यांना विवाहाची प्रत्येक माहिती ओटीटीवर पहायला मिळेल. वृत्त आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मवरून विक्की आणि कॅटरीनाच्या विवाहाबाबत डील झाली आहे, याच कारणामुळे विवाहाबाबत इतकी गुप्तता पाळण्यात आली आहे.

 

80 कोटीत झाली डिल
मिड-डेच्या रिपोर्टनुसार, कॅटरीना आणि विक्कीने आपल्या विवाहाच्या अधिकारांचा करार ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईमसोबत केलह आहे.
या डिलमधून विक्की आणि कॅटरीनाने मोठी रक्कम कमावली आहे. रिपोर्टनुसार ही डील 80 कोटीत झाली आहे.

 

या डीलच्या कारणामुळेच कॅटरीना आणि विक्कीने आपल्या पाहुण्यांकडून एनडीए साईन करून घेतले आहे
जेणेकरून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अगोदर विवाहाचा कोणताही फोटो सोशल मीडियावर वायरल होऊ नये.

 

पुढील वर्षी रिलिज होईल व्हिडिओ
रिपोर्टनुसार, विक्की आणि कॅटरीनाच्या विवाहाचा व्हिडिओ 2022 मण्से डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलिज होईल.
यामध्ये त्यांच्या रोकेपासून राजस्थानमध्ये झालेल्या विवाहाच्या सर्व विधी दाखवल्या जातील.

 

राजस्थानमध्ये विवाह
विशेष म्हणजे 2019 मध्ये, प्रियंका चोपडा आणि निक जोनास यांनी सुद्धा आपल्या विवाहाच्या सिरिजसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत करार केला होता.
विक्की आणि कॅटरिनाच्या विवाहात 120 पाहुणे सहभागी होणार आहेत.
सवाई माधोपुरच्या सिक्स सेन्स फोर्ट बरवाडामध्ये विवाहाचे सर्व कार्यक्रम सुरू आहेत.

 

Web Title :- Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | katrina kaif and vicky kaushal wedding will be telecast on ott amazon prime made deal for for 80 crore read inside story

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Malaika Arora | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करुन मलायका पोहोचली ‘शो’वर, दाखवल्या अदा; व्हिडीओ तुफान व्हायरल

Pune Crime | पुण्यात देहूरोड पसिरात आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; विदेशी तरुणीसह 10 जणींची सुटका

Pune Temperature | डिसेंबर अखेर राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्याच्या तापमानात घट