माहित नाही कधीपर्यंत सुरू राहिल ‘लॉकडाऊन’, ‘स्टारडम’ वाचवण्यासाठी ‘असं’ काही करतायेत ‘सेलेब्स’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  लॉकडाऊनमुळं सर्वच सेलेब्स घरात कैद आहेत. प्रत्येक स्टार केवळ चाहत्यांमुळं स्टार किंवा सुपरस्टार असतो. सध्या सर्वकाही बंद असलं तरी चाहत्यांच्या नजरेपासून दूर जाणं सेलेब्सच्या स्टारडमसाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळं चाहत्यांच्या टचमध्ये राहण्यासाठी चाहते अनेक उपाय करताना दिसत आहेत. बॉलवूड स्टार विद्युत जामवाल आणि टायगर श्रॉफ आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. फॅन्सच्या टचमध्ये राहण्यासाठी त्यांनी चाहत्यांना फिटनेस टिप्स देणं सुरू केलं आहे. विद्युतनं तर तसे सेशन्स घ्यायला सुरुवात केली आहे.

अनुपम खेर यांनी तर मजेदार पद्धत शोधून काढली आहे. त्यांनी स्वत:च शायरी लिहायला सुरूवात केली आहे. व्हिडीओ बनवून ते सोशलवर शेअर करत असतात. मनोज वाजपेयी देखील पोएट्रीच्या मदतीनं चाहत्यांच्या टचमध्ये रहात आहे. मनोज देखील कविता लिहून सोशल मीडियावर सादर करत आहे. रोज एक तरी कविता तो लहित आहे. द कपिल शर्मा शोची जज अर्चना पूरण सिंह सध्या घरातल्या गार्डनचं काम करत आहे आणि गार्डनमधील झलक शेअर करत आहे. अर्चना तिची मोलकरीन भाग्यश्रीसोबत कायमच व्हिडीओ शेअर करत असते.

पंजाबी सिंगर आणि अ‍ॅक्टर दिलजीत दोसांझ सध्या एखादी डिश बनवत आहे आणि त्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. त्याच्या व्हिडीओला प्रचंड व्ह्युज मिळत आहेत. कॅटरीना कैफदेखील घरातलं काम करत आहे. तिनंही काही व्हिडीओज चाहत्यांसबोत शेअर केले आहेत. बिग बॉस 13 ची स्पर्धक हिमांशी खुराना घरातच काम करत आहे सोबतच डान्स करत आहे. हिमांशीनं ही तिचे अनेक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.