कॅटरीनाचा ब्रेकअपबाबत पहिल्यादांचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या जगात रोजच एखाद्या अभिनेत्रीचे ब्रेकअप होते आणि एखाद्या अभिनेत्रीला नवीन प्रेम मिळते. बॉलिवूड जगतात ब्रेकअप होणं ही काही नवीन बाब नाही. परंतु ब्रेकअप होण्याचे कारण मात्र मोठी गोष्ट आहे. नुकतंच कॅटरीना कैफने तिच्या ब्रेकअपला घेऊन पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. कोणाचंही नाव घेता ब्रेकअपची कारणे सांगितली आहेत. सध्या कॅटरीना कैफ तिचा आगामी सिनेमा भारतच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती पुन्हा एकदा सलमान सोबत दिसणार आहे.

कॅटरीनाने तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबतच्या संबंधांबाबत मोठा खुलासा केला आहे. कॅटरीना आणि रणबीर यांनी एकमेकांना डेट केलं आहे. परंतु आता त्यांचं ब्रेकअप झालं आहे. रिपोर्टनुसार, असं बोललं जात आहे की, रणबीर कूपर सध्या आलिया भट्टला डेट करत आहे.

कॅटरीना म्हणाली की, “मी जे काम करते ते रिअल लाईफ एक्सपिरीयंसशी संबंधित असतं. मला स्वत:ला बनवण्याआधी स्वत:ला तोडावं लागलं आहे. मी फक्त माझ्या वाट्याची जबाबदारी घेऊ शकते आणि मला नाही वाटत की कोणी माझं मन दुखावलं आहे. प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे परंतु नेहमी या गोष्टीचं ध्यान ठेवायला हवं की, कोणी तुमची ओळख बनायला नको. एखाद्यासाठी तुम्ही कितीही करा त्यानंतरही कोणी तुम्हाला तुमची ओळख देत नाही. कॅटरीनाचा आगामी सिनेमा भारत हा 5 जून 2019 ला प्रदर्शित होणार आहे.