मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अॅक्ट्रेस कॅटरीना कैफ सध्या मेक्सिको मध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतंच तिने आगामी सिनेमा सुर्यवंशीचं हैद्राबादमधील शुटींग पूर्ण केलं आहे. यानंतर आता कॅट मेक्सिकोमध्ये आपलं व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती मेक्सिकोमधील सुदंर लोकेशनवर दिसत आहे.
या फोटोत कॅट समुद्रकिनारी पिलरसमोर पोज देताना दिसत आहे. तसंही कॅट सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने एका स्पोर्ट्स ब्रँडशी संबंध जाेडल्यानंतर आपले काही फोटो शेअर केले होते. जे व्हायरल झाले होते.
कॅटरीना नुकतीच भारत सिनेमात दिसली होती. ईदला हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात कॅट वेगळ्या अंदाजात आणि वेगळ्या लुकमध्ये दिसली. कॅटच्या या लुकची चांगली चर्चा होताना दिसून आली. अनेकांनी तिचे कौतुकही केले. या सिनेमात ती कुरुळ्या केसांच्या लुकमध्ये होती. तिचा मेकअपही खूप सिंपल होता. सिनेमातील कॅटच्या अॅक्टींगचीही खूप स्तुती झाली.
नुकतेच कॅटरीनाचे जीम मधील वर्क आऊट दरम्यानचे काही फोटो समोर आले होते जे व्हायरल झाले होते. कॅटरीना कैफ स्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसते.
कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कॅटने रोहित शेट्टीचा सुर्यवंशी सिनेमा साईन केला आहे. हा सिनेमाही सिंबा आणि सिंघमप्रमाणे कॉप ड्रामा सीरीजचा हिस्सा असेल. यात अक्षय कुमार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. २७ मार्च २०२० रोजी रिलीज होणार आहे.
स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत
चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या
सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या
केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या
सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या
जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही
पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा
अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय
सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्त, जाणून घ्या
स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?