Katrina Kaif | कतरिना कैफने तिच्या लग्नामध्ये झालेल्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा; म्हणाली…

0
1094
Katrina Kaif | katrina kaif vicky kaushal wedding actress says fight at her marriage revealed on kapil sharma show see details
file photo

पोलीसनामा ऑनलाईन : ‘फोन भूत’ (Phone Booth) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या कतरिना कैफ (Katrina Kaif) व्यस्त आहे. कतरिना या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. अशाच वेळी ‘द कपिल शर्मा’ (Kapil Sharma Show) शोमध्ये तिने हजेरी लावली असताना यावेळी तिने तिच्या आणि विकीच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा उलघडा केला. तर यावेळी कतरिनाने (Katrina Kaif) चक्क त्यांच्या लग्नात झालेल्या भांडणाविषयी (Fight At Her Marriage) देखील सांगितले.

कतरिनाला तिच्या लग्नामध्ये बूट लपवण्याचा कार्यक्रम झाला का?
कतरिनाला खूप साऱ्या बहिणी असल्यामुळे हा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
यावर उत्तर देताना कतरिना म्हणाली, “आमच्या लग्नामध्ये एक भांडण झालेलं मला आठवतं.
माझ्या मागे मोठ मोठे आवाज येत असल्याने मी मागे वळून पाहिले असता विकीचे (Vicky Kaushal) मित्र
आणि माझ्या बहिणी अक्षरशः जोर जोरात भांडत होते”. इतर लोकांप्रमाणे कतरिना आणि विकीच्या लग्नात देखील बूट चोरण्याच्या कार्यक्रमात जोरदार भांडण झाल्याचे समोर आले.

अर्चना पुरण सिंह (Archana Puran Singh) यांनी कतरिनाला (Katrina Kaif) विचारले या भांडणात शेवटी
कोण जिंकलं यावर कतरिना म्हणाली, “मी लग्नकार्यात व्यस्त असल्यामुळे मला याची माहिती नाही.
मी विचारले नाही पण हे भांडण माझ्या नेहमीच लक्षात राहणार आहे. एवढे मात्र नक्की”.
कतरिना कैफ आणि विकी यांचा विवाह सोहळा थाटामाटात जयपुर (Jaipur) मध्ये पार पडला होता.

Web Title :-  Katrina Kaif | katrina kaif vicky kaushal wedding actress says fight at her marriage revealed on kapil sharma show see details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Har Har Mahadev | ठाण्यात घडलेला प्रकार लांच्छनास्पद, महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागा…; ‘हर हर महादेव’ वादावर दिग्दर्शक अभिजित देशपांडेंची स्पष्ट भूमिका

Cursed Movie | हॉलीवूडचा ‘हा’ चित्रपट आहे शापित ; स्क्रिप्ट तयार असून देखील चित्रपट कधीच बनला नाही