Katrina Kaif News | कतरिनाच्या आयुष्यात घडली अशी काही घटना, अखेर तिला घ्यावा लागला बॉलीवूड सोडण्याचा निर्णय..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोठ्या पडद्यारील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचं (Katrina Kaif News) फॅन फॉलोविंग प्रचंड प्रमाणात आहे. तिनं आपल्या अभिनयानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच आपल्या अभिनयाच्या बळावर तिनं रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिनं अनेक हिंदी हिट चित्रपट दिले आहेत. मात्र सोशल मीडियावर (Social Media) तिच्या आयुष्यातील एक किस्सा चांगलाच व्हायरल होत आहे (Katrina Kaif News).

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शो मध्ये कतरिनानं हजेरी लावली होती. तिनं या शोमध्ये एका गोष्टीचा (Katrina Kaif News) खुलासा केला. ती म्हणाली, ‘मी सुरूवातीला जेव्हा बॉलीवूडमध्ये आले, तेव्हा माझे अनेक चित्रपट फ्लॉप झाले. मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यामध्ये अयशस्वी झाले. परंतु मला ‘नमस्ते लंडन (Namastey London)’ या चित्रपटाची ऑफर आली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मला वाटलं की, हा चित्रपटसुद्धा फ्लॉप होऊ शकतो. त्यामुळं या नंतर मी इंडस्ट्री सोडण्याचा विचार केला. मात्र हा चित्रपट माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देऊन गेला.’

दरम्यान, ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटामध्ये कतरिना (Katrina Kaif ) सोबत अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत दिसला. त्यामुळं अक्षयची साथ तिनं लकी असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटातील अक्षय आणि कतरिनाच्या (Akshay Kumar – Katrina Kaif) जोडीला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या चित्रपटांमधील गाण्यांसोबतच अनेक डायलॉगसुद्धा तुफान गाजले.

web title : Katrina Kaif News | the incident in katrinas life she decided to leave bollywood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा