17 वर्षांपूर्वी ‘हे’ काम सोबत करायच्या ‘देसी गर्ल’ प्रियंका आणि कॅटरीना, फोटो शेअर करत सांगितलं ‘सिक्रेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफनं एक फोटो शेअर करत तिच्या आणि अभिनेत्री प्रियंका चोपडाच्या 17 वर्ष जुन्या मैत्रीचा खुलासा केला आहे. सध्या कॅटनं शेअर केलेल्या या फोटोची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये आज आपली वेगळी ओळख तयार करणाऱ्या या दोन्ही अ‍ॅक्ट्रेस कथक ट्रेनिंगवेळी सोबत होत्या. दोघीही सोबत क्लासेस अटेंड करण्यासाठी जात होत्या.

प्रियंका चोपडा आणि आलिया भट नुकतेच कॅटरीना कैफच्या घरी गेले होते. सोमवारी कॅटनं आपल्या एका पोस्टमध्ये असंही सांगितलं आहे की, तिनं नुकताच लाँच झालेला मेकअप ब्रँड ब्युटी बाय कॅटरीनाच्या काही खास लिप कलर आणि आय पेन्सिल्स तिनं प्रियंकाला गफिट दिल्या. फोटोत दिसत आहे की प्रियंकाच्या हातात खूप साऱ्या आय पेन्सिल्स आणि लिप कलर आहेत.

कॅटच्या या पोस्ट प्रियंकानंही कमेंट केली आहे. प्रियंकानं लिहिलं आहे की, जवळपास 17 वर्षे झाली आहेत. तू मला प्रिय आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. कॅट आणि प्रियंका यांच्यातील मैत्रीचं नातं याआधीही दिसलं आहे. जेव्हा प्रियंका ट्रोल झाली होती तेव्हा कॅटरीना तिच्या समर्थनार्थ पुढे आली होती. ग्रॅमी 2020 मध्ये आपल्या लुकमुळे प्रियंका प्रचंड ट्रोल झाली होती.