हात न टेकवता कतरिनाने हे केले पुश-अप (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – पुशअप्स काढायचे म्हटले की हात आणि पायांचा वापर करावाच लागतो. मात्र अभिनेत्री कतरिना कैफने जमिनीवर हात न टेकवता पुशअप्स मारले आहेत. कतरिनाच्या पुशअप्सचा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ कतरिना कैफ फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना डेडिकेशनने वर्कआऊट करताना दिसते आहे. या व्हिडीओत ती प्रकारे पुशअप्स करताना दिसते. सुरुवातीला कतरिना दोन्ही हात जमिनीवर टेकवून पुशअप्स मारते. त्यानंतर ती एका हातानेच पुशप्स करताना दिसते आणि शेवटी तर ती दोन्ही हात जमिनीवर न टेकवता पुशअप्स करताना दिसते. हे कसे काय शक्य आहे? कतरिनाने हे नेमके केले तरी कसे? असा प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना पडला आहे.

व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळेल. व्हिडीओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्हाला हसूही आवरणार नाही. कतरिना एका लांब प्लायवूडवर आहे, ज्याला मध्येच आधार देण्यात आलेला आहे आणि त्याच्या दुसर्‍या टोकाला एक व्यक्ती उभी आहे. ज्यामुळे सी-सॉप्रमाणे या प्लायवूडची हालचाल होते आहे आणि कतरिता हात न टेकवता पुशअप्स मारू शकते. कतरिनाचा हा व्हिडीओ मार्चमधील आहे. मात्र तो पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. दरम्यान लॉकडाऊनमध्ये कतरिना सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. आपल्या सोशल मीडियावर ती असे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.