भारत सिनेमा निवडताना दिग्दर्शकासमोर ठेवली होती ‘ही’ अट : कॅटरीनाचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच बॉलिवूड अदाकारा कॅटरीना कैफने भारत सिनेमाबाबत एक खुलासा केला आहे. भारत सिनेमा निवडताना कॅटने या सिनेमाच्या दिग्दर्शकाला एक अट घातली होती. त्याबाबत तिने आता सांगितले आहे. एका मुलाखतीत ती बोलत होती. ती अट कोणती होती त्याची आपण माहिती घेणार आहोत.

‘तरच मी सिनेमाचा हिस्सा बनेल’
कॅटरीना म्हणाली की, “मी भारत सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांना म्हटलं होतं की, जर भूमिका मजबूत असेल तरच मी या सिनेमाचा हिस्सा बनेल.” तु्म्हाला सांगू इच्छितो की, हा रोल आधी प्रियंका चोपडाला ऑफर करण्यात आला होता. परंतु निक जोनाससोबत लग्नामुळे ती या सिनेमातू बाहेर पडली. नंतर ही भूमिका कॅटरीनाला मिळाली.

‘हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं’
कॅटरीना पुढे म्हणते की, “कुमुद रैना असं तिच्या भूमिकेचं नाव आहे. त्यासाठी मला खूपच तयारी करावी लागली आहे. हे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं. कारण सिनेमात रोल 40 वर्षांपर्यंत चालत आहे.”

‘माझ्या करिअरमधील सर्वात उत्तम रोल’
कॅटरीना सांगते की, “हा रोल म्हणजे माझ्या करिअरमधील सर्वात अप्रतिम रोल आहे. सलमान खानच्य सिनेमात इतर कोणा कलाकाराला जास्त स्क्रिन टाईम मिळत नाही. हे माझं भाग्य आहे की, मला या सिनेमात एक मजबूत रोल मिळाला आहे. कॅटरीना लवकरच रोहित शेट्टीचा सिनेमा सुर्यवंशी मध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा 2020 मध्ये ईदला रिलीज होणार आहे.