कतरिना कैफने करिअरबाबतीत केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफचा भारत चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई केली. कतरिना या आधी शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या ‘जीरो’ चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपटाचा बॉक्स ऑफीसवर चालू शकला नाही. कतरिनाने एका मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. एका मुलाखतीत कतरिनाला विचारले की, ‘जीरो’ चित्रपटाला अनेकांनी टिका केली. या टिकेला तु कशी सामोरी गेली ?

कतरिनाने उत्तर दिले की, हा प्रश्न तिला ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी विचारला होता. बॉलिवूड करिअरमध्ये असे चढ-उतार होत असतात. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे. कतरिनाने सांगितले की, ‘लोक काय विचार करतात याचा मला अंदाज नाही. गेल्या काही दिवसांपासून ‘भारत’ चित्रपटाच्या रिव्हूला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत आपल्या स्वतःला सातत्याने सिद्ध करावे लागते.’

कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये १५ वर्षाचा अनुभव शेअर करत सांगितले की, बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देणारे कलाकार यामध्ये टिकतात. जर तुम्ही चांगले काम करत असाल तरच लोक तुम्हाला ओळखू शकता. फ्लॉप चित्रपट करत असाल तर प्रेक्षकांचे लक्ष तुमच्यावर राहणार नाही. त्यामुळे आपल्याला नेहमीच बेस्ट काम करणे गरजेचे आहे.

आरोग्य विषयक वृत्त

जागतिक रक्तदान दिन : गरिबांचा कैवारी ‘अनिल लुणिया’

किहोल सर्जरी ‘ब्रेन ट्युमर’ काढण्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ‘केमोथेरेपी’ म्हणजे नेमकं काय ?

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like