कतरिना’नं शेअर केला ‘वीर सुर्यवंशी’चा ‘खाकी’ अंदाज !

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – सुर्यवंशी सिनेमातून कतरिना कैफ अक्षय कुमार बरोबर दिसणार आहे. कतरिनाने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यात पोलिसांची खाकी आहे आणि त्यावर वीर सूर्यवंशी लिहिलेले आहे. या सिनेमात अक्षय कुमार वीर सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिनेमामध्ये वीर सुर्यवंशी दहशतवाद्यांंच्या विरोधात लढताना दिसेल. सिम्बा प्रमाणेच रोहित शेट्टीचा हा सिनेमा एका साऊथ सिनेमाचा रिमेक असल्याचे मानले जात आहे. तमिळमधील सूर्यवंशी या सिनेमाचा हा हिंदी रिमेक मानला जात आहे.

View this post on Instagram

💃💃 @iifa @wizcraftindia #IIFA20

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सिनेमा रिमेक असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर रोहित मात्र भलताच भडकला. त्यांने स्पष्ट केले की सुर्यवंशी कोणत्याही चित्रपटात रिमेक नाही, ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते. हा सिनेमा 27 मार्चला रिलीज होणार आहे.

या आधी बॉलिवूडमध्ये देखील सुर्यवंशी नावाचा सिनेमा रिलीज झाला होता, सुर्यवंशी नावाचा दाक्षिणात्य सिनेमा देखील आहे. परंतू हा रिमेक नसल्याचे रोहितने स्पष्ट केल्याने सिनेमात काय वेगळे असणार याची उस्तुकता चाहत्यांमध्ये आहे.

Visit : Policenama.com 

You might also like