‘भारत’ सिनेमातील कतरिना कैफचा लुक व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या भारत या आगामी सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसत आहे. यात सलमानसोबत कतरिना कैफदेखील झळकणार आहे. या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. यानंतर आता या सिनेमातील कतरिनाचा लुक समोर आला आहे. कतरिनाने सोशल मीडियावर तिचा हा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कतरिना या लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

‘भारत’चा टीझर-

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा लुक शेअर केला आहे. शिवाय भारतचा ट्रेलर अवघ्या 10 प्रेक्षकांच्या भेटीला येईल असेही तिने कॅप्शन मध्ये म्हटले आहे. तिच्या पोस्टवरून लक्षात येते की, 24 एप्रिल रोजी भारतचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

#Bharat ❤️10 days to trailer

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

अली अब्बास जफर यांनी भारतचे दिग्दर्शन केले आहे. भारत सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत तर याशिवाय जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, सुनील ग्रोवर, तब्बू हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. भारत हा सिनेमा 5 जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us