Video : कॅटरीना कैफनं दिली ‘हेअर ट्रीक’ ! हसून पागल झाले चाहते

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसत असते. काही दिवसांपासून तिचे काही वर्कआऊटचे व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. कधी कधी ती फॅशन आणि ब्युटी टीप्सही देताना दिसते. पुन्हा एकदा तिचा एक व्हिडीओ समोर आला ज्यात ती विचित्र हेअर स्टाईल करायला शिकवत आहे.

कॅटरीनानं दिली ही हेअर ट्रीक

कॅटरीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं डेनिम शॉर्ट आणि ट्रँक टॉप घातला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, ती केसांना खाली झुकून पडकताना दिसत आहे. लगेचच ती त्यावर एक रबर बँडही लावताना दिसते. व्हिडीओच्या शेवटी ती जोरात हसताना दिसते. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

कॅटरीनाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. अनेकांनी यावर लाफींग इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय तिनं डायरेक्टर विकास बहलचा डेडली हा सिनेमा साईन केल्याचंही बोललं जात आहे. आता 2021 मध्ये ती फोन भूत या सिनेमातही दिसणार आहे.