अबब ! शाही लग्‍नासाठी २०० ‘चॉपर’, १०१ ‘पंडित’ बुक, एकूण खर्च २०० कोटी ; अभिनेत्री कतरिना कैफसह २५० आर्टिस्टची ‘हजेरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या उत्तराखंडच्या ओलीमध्ये होणाऱ्या 200 कोटीच्या लग्नाची भलतीच चर्चा सुरु आहे. हे मोठे लग्न NRI गुप्ता बंधू (अजय गुप्ता आणि अतुल गुप्ता) यांच्या मुलांचे आहे. सर्वोच्च्य न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने या लग्नावर लक्ष ठेवले आहे. उत्तराखंडच्या प्रसिद्ध स्काइंग रिसोर्टमध्ये लग्नाची तयारी सुरु आहे. बॉलिवूड पासून सर्व क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती लग्नाला हजेरी लावणार आहेत.

लग्नात 250 पेक्षा आधिक आर्टिस्ट सहभागी होणार आहेत, यात कैलाश खेर, बादशाह, कनिका कपूर आणि बॉम्बे रॉकर्स सारखे सिंगर यात उपस्थिती लावतील.

एवढेच नाही तर लग्नात बॉलिवूड एक्ट्रेस कटरिना कैफ आणि एक्टर सिद्धार्थ मल्होत्रा परफॉर्म करणार आहेत. लग्नाला अजून अलीशान बनवण्यासाठी बॉलिवूडच्या तसेच टीव्हीच्या बऱ्याच कलाकारांना बोलवण्यात आले आहे.

लग्नात सिंगर्स देखील येणार आहे. त्यात जावेद अली, शिल्पा राव, अभिजित सावंत, नकश अजीज, ऐश किंग, टिया बाजपेयी आणि इतर अनेक जण सहभागी होणार आहेत. याशिवाय रोशनी चोपडा, उर्वशी रौताला, हुसैन कुवजेरवाला, करणवीर बोहरा, सना खान आणि नोरा फतेही देखील उपस्थिती लावतील.

200 कोटी रुपयांच्या लग्नावर सर्वांचेच लक्ष असणार आहे. या शाही लग्नात स्विजरलॅंडवरून फुले मागवण्यात आली आहेत. ज्यावर 5 कोटी पेक्षा आधिक खर्च करण्यात आला आहे. ओली येथील रस्त्यांना फुलांनी सजवण्यात आले आहे. या लग्नासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात 101 पंडितांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कोट्याधीश बापाच्या मुलींबरोबर गुप्ता बंधूच्या मुलांचे लग्न –
येथे अजय गुप्ता यांचा मुलगा सुर्यकांत याचे लग्न 20 जून ला होणार आहे तर अतुल गुप्ता यांच्या मुलाचे म्हणजेच शशांक यांचे लग्न 22 जूनला होणार आहे. सुर्यकांत यांचे लग्न डायमंड व्यापारी सुरेश सिंघल यांची मुलगी कृतिका सिंघल आणि शशांक याचे लग्न दुबईतील बिजनेसमन विशाल जलान यांची मुलगी शिवांग जलान हीच्या बरोबर असणार आहे. या शाही लग्‍नासाठी तब्बल 200 हेलीकॉप्टर बुक करण्यात आले आहेत.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची