Video : जीममध्ये घाम गाळताना दिसतेय कॅटरीना कैफ ! सुरू झाल्या ‘अशा’ चर्चा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस कॅटरीना कैफ (Katrina Kaif) आपल्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसत असते. काही दिवसांपासून तिचे काही वर्कआऊटचे व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अलीकडेच तिनं पुन्हा एकदा तिचा वर्कआऊट व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळं एका विषयाला चर्चाही सुरू झाली आहे.

कॅटरीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती एक्सरसाईज करताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रेड कलरचा आऊटफिट घातला आहे. तिच्या सोबत ब्लॅक आऊटफिटमध्ये तिची ट्रेनर देखील दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शन दिलं आहे ज्यात तिनं या एक्सरसाईज सेशन बद्दलही सांगितलं आहे.

https://www.instagram.com/reel/CJs8G-3Bvyg/?utm_source=ig_embed

कॅटरीनाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिच्या लुकचं आणि एक्सरसाईचं कौतुक केलं आहे. तिचा फिटनेसही साऱ्यांना आवडला आहे.

https://www.instagram.com/reel/CKRJahChz9m/?utm_source=ig_embed

टायगरसाठी कॅटरीनाची तयारी
असं मानलं जात आहे की, टायगर 3 या सिनेमाचं डायरेक्शन देखील अली अब्बास जफर करणार आहेत. कॅटरीनाचे वर्कआऊट सेशन पाहिल्यानंतर आता आता असं बोललं जात आहे की, तिची ही तयारी आगामी सिनेमासाठीचीच आहे. टायगर 3 साठी कॅटरीना ही मेहनत घेत आहे अशाही चर्चा होताना दिसत आहेत.

2012 साली रिलीज झाला होता पहिला सिनेमा
2012 साली एक था टायगर सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा कबीर खाननं डायरेक्ट केला होता. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. सिनेमानं 320 कोटींची कमाई केली होती. यानंतर 2017 साली टायगर जिंदा है हा सिनेमा रिलीज झाला या सिनेमात कॅटरीना आणि सलमान पन्हा एकदा एकत्र काम करताना दिसले. याचं डायरेक्शन अली अब्बास जफर यांनी केलं होतं. आता टायगर 3 बद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.

कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायाचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय तिनं डायरेक्टर विकास बहलचा डेडली हा सिनेमा साईन केल्याचंही बोललं जात आहे. आता 2021 मध्ये ती फोन भूत या सिनेमातही दिसणार आहे.