Video : कॅटरीना कैफनं शूटिंगपूर्वी केली ‘कोरोना’ टेस्ट ! शेअर केला व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अॅक्ट्रेस कॅटरीना कैफ (Katrina Kaif) लॉकडाउननंतर पुन्हा एकदा कामावर आली आहे. इतरांप्रमाणे तिलाही कोरोनाची भीती सतावत आहे. अशातच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती शूटिंगपूर्वी कोरोना टेस्ट (Covid-19 Test) करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.
कॅटरीनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. कॅटनं स्वत:ची तिची कोरोना टेस्ट केली आहे. व्हि़डिओ शेअर करताना कॅट म्हणते, शूटवर जाण्याधी टेस्टिंग. हे गरजेचं आहे. सर्वांनी करायला पाहिजे. व्हिडिओत डॉक्टर पीपीई किटमध्ये दिसत आहे. टेस्ट केल्यानंतर कॅटदेखील हसताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं व्हाईट आउटफिट घातला आहे.
अलीकडेच ती मालदीववरून परत आली आहे. सुरक्षेची काळजी घेत तिनं कोरोना टेस्ट केली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
कॅटरीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती सूर्यवंशी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सिनेमाची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. या सिनेमात ती अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्तानं ती रोहित शेट्टीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे. याशिवाय तिनं डायरेक्टर विकास बहलचा डेडली हा सिनेमा साईन केल्याचंही बोललं जात आहे. आता 2021 मध्ये ती फोन भूत या सिनेमातही दिसणार आहे.