सोशल मिडियावर कतरिनाचा सेक्सी लुक व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. कतरिना सध्या तिचा आगामी चित्रपट ‘भारत’ च्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. ‘भारत’ हा चित्रपट येत्या ५ जून ला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात कतरिना कैफ सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याच दरम्यान कतरिनाने आपल्या इन्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे.

या फोटोमध्ये कतरिना हॉट आणि सेक्सी लुकमध्ये दिसत आहे. या फोटोत कतरिनाने लॉग ऑफ सोल्डर गाउन परिधान केला आहे.

कतरिनाने शेअर केलेले फोटो तिच्या चाहत्यांना खूप पसंतीस पडले आहे. फोटो शेअर करुन कतरिनाने कॅप्शन लिहले आहे की, ‘फूलों से भरा भारत’

फोटोमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. भारत चित्रपटात कतरिनाने सिंपल साडीमध्ये दिसून येत आहे. याचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

चित्रपटातील तिचा लुक चाहत्यांना खुप आवडला आहे. याआधी देखील कतरिना अशा सिंपल लुक मध्ये दिसून आली होती. ती नेहमी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते.

कतरिना सतत तिचे बोल्ड आणि सेक्सी फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. चाहत्यांना तिचे सगळे फोटो खुप आवडतात. तिच्या प्रत्येक फोटोला चाहते मेसेज आणि कमेंट करत असतात.