Katrina-Vicky Death Threat | कतरिना कैफ-विकी कौशल यांना ठार मारण्याची धमकी देणारा आरोपी अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Katrina-Vicky Death Threat | कतरिना कैफ आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास केल्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. (Katrina-Vicky Death Threat)

 

तत्पूर्वी, एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी आणि कतरिनाला सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सायबर शाखेने आरोपीची ओळख पटवली होती. आरोपी कतरिना कैफ (Katrina Kaif) ला सोशल मीडियावर स्टॉक करत होता आणि तिच्या पोस्टवर अश्लील कमेंट लिहीत होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) (धमकी) आणि 354 (डी) (महिलेचा अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Katrina-Vicky Death Threat)

 

पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयटी अ‍ॅक्ट 67 (अश्लील फोटो, व्हिडिओ आणि कमेंट पोस्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे (Katrina Kaif Vicky Kaushal Death Threat).

मुंबई पोलिसांनी सांगितले की, आरोपी कतरिना कैफला इन्स्टाग्रामवर स्टॉक करत होता
आणि इंस्टाग्रामवरच अभिनेत्रीला धमकीचा मेसेज पाठवला होता. विकी कौशलने याबाबत फिर्याद दिली आहे.
त्याने फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी त्याच्या पत्नीला स्टॉक करत असे आणि धमक्या देत असे.

 

मालदीवला गेले होते विकी-कतरिना
कतरिना कैफ आणि विकी कौशल अलीकडेच मालदीवच्या सुट्टीवर गेले होते,
जिथे दोघांनी कतरिनाचा वाढदिवस साजरा केला. त्याचे फोटोही या जोडप्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

Web Title :- Katrina-Vicky Death Threat | vicky kaushal katrina kaif death threrat police registered case and arrest one

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | तलावाच्या मधोमध गेल्यावर लागला दम, महसूल विभागातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू

 

Nitin Gadkari | ‘… राजकारण सोडावंसं वाटतं’; नितीन गडकरींच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले…

 

CM Eknath Shinde | ‘…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता’, CM एकनाथ शिंदे यांनी सांगितलं