Coronavirus : ‘कोरोना’मुळे सिंगर केटी पेरीनं रद्द केला स्वतःचा विवाह सोहळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हॉलीवुड पॉप सिंगर केटी पेरी आणि अ‍ॅक्टर ऑरलँडो ब्लूम यांनी आपल्या विवाहाची तारीख स्थगित केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वत्र पसरत असल्याने या दोघांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. केटी आणि ऑरलँडो जपानमध्ये विवाह करणार होते. परंतु, जपानमध्ये सध्या कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू आहे. यामुळे दोघांनी तेथे जाणे रद्द केले आहे.

विवाह पुढे ढकलला
एका सूत्राने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे या स्टार जोडीने आपल्या ग्रँड वेडिंगबाबत पुन्हा विचार केला आणि तो पुढील वर्षी करण्याचा निर्णय घेतला. आता केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूम 2021 मध्ये विवाह करतील. तोपर्यंत पेरी आई झालेली असेल.

बुधवारी अमेरिकन सिंगर केटी पेरीने फॅन्सला सरप्राईज गिफ्ट दिले. तिने आपला नवा म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला. या व्हिडिओद्वारे तिने आपल्या पहिल्या गरोदरपणाची घोषणा केली आहे. यासोबतच केटीने आपल्या इंस्टाग्रामवर लाइव्ह चॅटदरम्यान आपल्या बेबी बम्पची झलक फॅन्सला दाखवली.

हे केटी पेरीचे पहिले आणि ऑरलँडो ब्लूमचे दुसरे मुल असेल. केटी पेरी आणि ऑरलँडो ब्लूमने फेब्रुवारी 2019 मध्ये साखरपुडा केला होता. पेरीने इंस्टाग्रामवर आपल्या आंगठीचा फोटो शेयर करून याची घोषणा केली होती.

जपानमध्ये सध्या सर्वात जास्त कोरोनाचा धोका आहे. येथे कारोना व्हायरसची 1000 प्रकरणे समोर आली आहेत. एकुण 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक अस्वस्थ आहेत. भारतात सुद्धा हा आजार पसरू लागला आहे.