‘बिग बी’ अमिताभनं ताज्या केल्या बालपणाच्या आठवणी, सांगितलं 2 रुपये मिळत होते ‘पॉकेटमनी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 11 व्या सीझनमुळे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत. 9 ऑगस्टपासून कौन बनेगा करोडपती’ चे 11 वे सीझन सुरु झाले आहे. या शो मध्ये मध्यप्रदेशच्या जबलपुरच्या नितिन कुमार पटवा हॉट सीटवर बसला आहे. नितिन कुमार यूपीएससीची तयारी करता करता एका दुकानातही कामाला जात आहे. शो मधील नितीनशी संभाषणादरम्यान अमिताभ बच्चन यांनी भूतकाळातील आठवणी सांगितल्या. त्यांनी आपल्याला लहानपणी किती पॉकेटमनी मिळायचे याविषयी माहिती सांगितली.

शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी नितीनला विचारले की तुम्हाला किती पॉकेटमनी मिळतो. नितीनने सांगितले की त्याचे छंद जास्त नाहीत परंतु तरीही वडिलांकडून त्याला दररोज 50 रुपये मिळतात. त्यामधूनही तो सेव्हिंग करतो. नितीनकुमारची आई पूर्वी दुकानात काम करायची मात्र आजारपणामुळे तिला काम करता येणे अशक्य झाले. आईच्या आजारपणामुळे नितीनला दुकान सांभाळावे लागले. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. नितीन थोडा वेळ दुकानात बसून उर्वरित वेळ अभ्यास करतो.

यानंतर अमिताभ बच्चन यांनीही आपल्या बालपणी किती पॉकेटमनी मिळायचे याविषयी सांगितले. बिग बी म्हणाले की ,’तुम्ही खूप भाग्यवान आहात. जेव्हा मी तुमच्याएवढा होतो तेव्हा मला महिन्याला 2 रुपये पॉकेटमनी मिळायचे. तेव्हा मी नैनीतालच्या बोर्डिंग स्कूलमध्ये होतो. हा डोंगराळ भाग असल्याने खूपच बंधने होती. त्यामुळे आम्ही बर्‍याचदा तणावात असायचो. वसतिगृहापासून थोड्या अंतरावर एक छोटेसे दुकान होते. तिथे भजी खूप चविष्ट मिळायचे. आम्ही गुपचूप जाऊन भजी खात होतो.’

केबीसीमध्ये नितीन चांगला खेळ खेळत असून त्याने आत्तापर्यंत 3,20,000 रुपये जिंकले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like