KBC च्या १२ सीझनमध्ये अनुपा बनल्या तिसऱ्या करोडपती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कौन बनेगा करोडपतीचा १२वा सीझन एका नव्या वळणावर आला आहे. या सीझनमध्ये नाझिया नसीम आणि मोहिता शर्मा यांच्यानंतर आता अनुपा दास यांनीही १ कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे तब्ब्ल तीन महिलांनी करोडपती होऊन इतिहास रचला आहे. अनुपा यांनी १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देत हा विजय मिळवला असून, त्यांनी फारच समजूतदारीने हा खेळ खेळला.

केबीसीमध्ये १ कोटीसाठी अनुपा यांना १८ नोव्हेंबर १९६२ ला लडाखच्या रेजांग लामध्ये कुणाला त्यांच्या बहादुरीसाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते? असा प्रश्न विचारला होता. अनुपा यांच्यासाठी हा प्रश्न कठीण वाटत होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी ५०-५- लाइफलाइनचा वापर केला. त्यातून त्यांनी मेजर शैतान सिंह हे उत्तर दिलं. अमिताभ बच्चन यांनी थोडावेळ सस्पेन्स कायम ठेवला, पण नंतर थेट सांगितलं की, अनुपा दास यांनी एक कोटी रुपये आपल्या नावावर केले आहेत. केवळ इतकंच नाही तर अनुपा यांनीही पूर्ण आत्मविश्वासाने या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, त्यांना १०० टक्के या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं.

अनुपाच्या अंदाजावर अमिताभ प्रभावित
अनुपा यांनी त्यांच्याकडे असलेल्या समजदारीमुळे विना लाइफलाइनही एक कोटी रुपये जिंकले. त्यांच्या या अंदाजाने अमिताभ बच्चन चांगलेच प्रभावित झाले. त्यांनी त्यांचा खेळ अद्भुत असल्याचं सांगितलं आणि त्यांच्या खेळाचंही कौतुक केलं. ते म्हणाले की, त्या तर विना लाइफलाइनही एक कोटी रुपये आपल्या नावावर करू शकल्या असत्या. आता या पैशातून अनुपा यांना अनेक स्वप्ने पूर्ण करायची आहेत. त्यांना आईवर उपचार करायचे आहेत आणि शाळेतील मुलींसाठी काही खास करायचं आहे.

.. त्यामुळे शो केला क्विट
एक कोटी जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी अनुपा यांना ७ कोटी रुपयांचा प्रश्न विचारला. हा एक क्रिकेटसंबंधी प्रश्न होता. रिया पूनावाला आणि शौकंत दुकानवालाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्या टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे? असा हा प्रश्न होता. याचे उत्तर अनुपा यांना माहीत नव्हते. मात्र त्यांनी अंदाज बरोब्रर लावला होता. पण आत्मविश्वास नसल्याने त्यांनी शोमधून क्विट होणे पसंत केले. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं युनायटेड अरब अमिरात. जर त्यांनी लावलेला अंदाज लॉक केला असता, तर त्या ७ कोटी रुपये जिंकल्या असत्या.

You might also like