KBC : 25 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला खेळ, तुम्हाला माहितीय का उत्तर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवारी कौन बनेगा करोडपतीच्या मालिकेची सुरुवात सोमवारच्या रोलओव्हर स्पर्धक श्रुती सिंगपासून झाली. श्रुती वलसाड गुजरातमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. अत्यंत हुशारीने खेळत तिने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. श्रुतीने अशा अनेक प्रश्नांवर लाइफलाईन वापरली ज्याची तिला उत्तरे माहित होती.

तथापि, या उत्तरांबद्दल तिला विश्वास नव्हता, त्यानंतर तिने या प्रश्नांवर एक लाइफलाइन घेण्याचे ठरविले. श्रुती आणि अमिताभ बच्चन यांच्यातल्या मजेदार संभाषणाचाही लोकांनी खूप आनंद लुटला, पण 25 लाखांच्या प्रश्नाला श्रुती उत्तर देऊ शकली नाही. तोपर्यंत तिच्या सर्व लाईफलाइन संपल्या होत्या आणि तिला प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. म्हणून तिने खेळ सोडण्याचे ठरविले.

25 लाखांचा प्रश्न काय होता ?
कौन बनेगा करोडपती मध्ये श्रुतीला 25 लाख रुपयांसाठी विचारलेला प्रश्न होता- आशियाई खेळात कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती?
1. गीता फोगट
2. विनेश फोगट
3. बबिता फोगट
4. साक्षी मलिक

बहुतेक प्रश्नांच्या बाबतीत, अचूक अंदाज लावणारी श्रुती या प्रश्नावर अडकली आणि 25 लाखांच्या प्रश्नावर तिने अंदाज न लावण्याचा निर्णय घेतला. जेव्हा श्रुतीने खेळ संपवला तेव्हा अमिताभ बच्चन यांनी श्रुतीला कोणतेही एक उत्तर विचारले असता तिने साक्षी मलिक असे उत्तर दिले, पण योग्य उत्तर होते – विनेश फोगट.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like