×
Homeताज्या बातम्याKaun Banega Crorepati (KBC-14) | कोल्हापुरच्या कविता चावला बनल्या करोडपती; 1 कोटी...

Kaun Banega Crorepati (KBC-14) | कोल्हापुरच्या कविता चावला बनल्या करोडपती; 1 कोटी जिंकणारी KBC 14 ची पहिली स्पर्धक, 21 वर्षांनंतर पूर्ण झाले स्वप्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोनी टीव्हीचा (Sony TV) रिअ‍ॅलिटी शो (Reality Show) ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन 14 ला (Kaun Banega Crorepati (KBC-14) पहिला करोडपती मिळाला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरमध्ये (Kolhapur) राहणाऱ्या कविता चावला (Kavita Chawla) यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र कविता यांनी 7.5 कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कविता याआधीही कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati (KBC-14) मध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र शोमध्ये सहभागी झालेल्या चावला यांना हॉटसीटवर (Hot Seat) बसता आले नाही. पण त्यांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि एक कोटी रुपये आपल्या नावावर केले.

कविता चावलांचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत

कविता चावला या बारावी पर्यंत शिकल्या आहे. मात्र त्यांनी शिकण्याची (Learning) आणि वाचण्याची (Reading) आपली आवड कायम ठेवली. कविता यांनी सांगितले, की माझे वाचन करण्याचे एकमेव कारण म्हणजे कौन बनेगा करोडपती Kaun Banega Crorepati (KBC-14), 2000 साली सुरु झालेल्या या शो मध्ये भाग घ्यायचा होता. मागील वर्षी देखील मी आले होते. मात्र त्यावेळी मला फक्त फास्टेस्ट फिंगर राउंड (Fastest Finger Round) गाठता आला. यावर्षी मी हॉटसिट पर्यंत पोहचले आणि KBC मध्ये येण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले. मी माझ्या मुलाला शिकवायचे, त्यावेळी मला देखील खूप शिकायला मिळाले, असे चावला यांनी सांगितले.

मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवणार

कविता चावला यांनी एक कोटी जिंकल्यानंतर त्यांना विचारण्यात आले, की एवढ्या पैशांचे तुम्ही काय करणार ?
यावर कविता म्हणाल्या, जिंकलेल्या पैशातून मी माझ्या मुलाला पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठवणार आहे.
जर मी पुढच्या प्रश्नाचे उत्तर देऊन 7.5 कोटी रुपये जिंकले तर मी माझ्यासाठी बंगला बांधून जगभर फिरेन.
मी कौन बनेगा करोडपती ची आभारी आहे ज्यांनी माझी अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Web Title :- Kaun Banega Crorepati (KBC-14) | kbc 14 kavita chawla won one crore in kaun banega crorepati 14 took 21 years to reach the hot seat

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News