KBC : दूधासाठीही पैसे नसलेल्या रेखा राणीने जिंकले 6 लाख 40 हजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कौन बनेगा करोडपतीमध्ये गुरूवारी रेखा राणीने आपल्या मजेदार अंदाजाने सर्वांची मने जिंकली. तीने शोमध्ये ६ लाख ४० हजार रूपये जिंकले. मी लोअर मिडल क्लासमधून आहे, एक वेळ अशीही आली की, दूध खरेदीसाठीही पैसे नव्हते आणि आयुष्यात कधीही इतके पैसे जिंकले नाहीत.असे तिने शोमध्ये सांगितले.

रेखा राणी दिल्लीची राहणारी असून २७ वर्षांची आहे. ती लोअर मिडल क्लासमधून येते. शोमध्ये रेखाने अमिताभ बच्चन यांना सांगितले की, तिने आयुष्यात कधीही इतके पैसे पाहिले नाही. कोरोनामुळे घरात पैशांची इतकी चणचण होती की, दूधही विकत घेऊ शकत नव्हते. एक वेळ तर अशी आली होती की, कुणालाही कॉल केला तर सर्वांना असं वाटत होतं की, पैसे मागण्यासाठी फोन केला. त्यामुळे कुणी फोनही उचलत नव्हते. अशावेळी माझ्या मित्रांनी माझ्यासाठी खूप काही केलं. एवढं तर सख्खे नातेवाईकही करत नाही. रेखा राणीचे वडील ऑटो रिक्षा चालवतात.

या प्रश्नावर केलं क्विट
रेखाने शोमध्ये १२ लाख ५००० रूपयांच्या प्रश्नावर शो क्विट केला. सईद मिर्झामध्ये नसीमच्या आजोबांची भूमिका कोणत्या कवींनी साकारली होती. पर्याय होते (A) कैफी आजमी, (B) मजरूह सुल्तानपुरी, (C) गुलजार, (D) जावेद अख्तर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं कैफी आजमी.