… म्हणून 40 व्या वर्षी देखील इंस्पेक्टर ‘चंद्रमुखी’ला व्हायचं नाही कधी आई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री कविता कौशिकची FIR ही मालिका खूप फेमस आहे. तिनं साकारलेली महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सर्वांनाच भावली आहे. कविता आपल्या बोल्ड किंवा योगा करतानाच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. आज कविता आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. कविताचा जन्म 15 फेब्रुवारी 1981 रोजी काशीपूरमध्ये झाला आहे. आज आपण कविताच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. कविताला कधीच आई व्हायचं नाही असं तिनं सांगितलं होतं. याचं कारणही तिनं सांगितलं होतं.

2007 साली कविता कौशिकनं रोनित विश्वाससोबत लग्न केलं. सध्या आपल्या मॅरिड लाईफमध्ये खुश आहे. एका मुलाखतीत तिनं सांगतिलं होतं की, तिनं लग्न केलं आहे. परंतु तिला कधी आई व्हायचं नाही. कवितानं याचं कारणही सांगितलं आहे. पती रोनितसोबत मिळून तिनं हा निर्णय घेतल्याचं तिनं सांगितलं होतं.

कविता म्हणाली होती, “मला मुलांसोबत अन्याय करायचा नाही. जर मी 40 व्या वर्षी आई झाले तर माझा मुलगा जेव्हा 20 वर्षांचा होईल तेव्हा मी म्हातारपणाच्या उंबरठ्यावर असेल. माझ्या मुलानं 20 व्या वर्षी म्हाताऱ्या आई वडिलांच्या जबाबदाऱ्या उचलाव्यात असं मला अजिबात वाटत नाही.”

कविता पुढे म्हणते, “आम्हाला जगाला शांत आणि हलकं ठेवायचं आहे. आधीच गर्दीनं भरलेल्या जगाला आम्हाला मोठं कारयचं नाहीये.”

पतीबद्दल बोलताना कविता म्हणते, “रोनित जेव्हा खूप लहान होता तेव्हाच त्यानं आपल्या आई-वडिलांना गमावलं. माझ्यासोबतही असंच झालं होतं. एकुलती एक मुलगी असल्यानं मला खूप मेहनत करावी लागली. मला माझ्या कुटुंबाला उदरनिर्वाह करण्यासाठी मला खूप सपोर्ट करावा लागला आहे.”

कविता म्हणते, “आम्ही आयुष्य मुलांसारखं एन्जॉय करत आहोत. प्रवास करत आहोत आणि कपल गोल्स पूर्ण करत आहोत. कधी कधी मी त्याच्यासोबत बाप असल्यासारखं वागते तर तोही आई असल्यासाखं वागतो.”

कवितानं सांगितलं की, “आम्ही आमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरण्याचं काम करत असतो. यामुळे आम्हाला मूल नसल्याची कमतरता जाणवत नाही. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही वडिलांनी वाढवलेल्या कुटुंबाची मदत करत असतो जे राजस्थानच्या एका गावात राहतं.”