कविता कौशिकनं खास अंदाजात साजरी केली ‘महाशिवरात्री’, दाखवला पाठीवरील ‘भोलेनाथ’चा टॅटू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज देशभर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला. अशात टीव्ही ॲक्ट्रेस कविता कौशिक हिनंही उत्सव साजरा केला. परंतु आपल्या टॅटूमुळे तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कवितानं काही फोटो शेअर केले आहेत ज्यात शंकर महादेवाचा टॅटू फ्लाँट करताना दिसली. सध्या तिचे काही फोटो चर्चेत आले आहेत.

कवितानं नुकतेच इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत साडी घातलेली कविता खूपच सुंदर दिसत आहे. तिनं काही बॅकसाईटचे फोटो शेअर केले आहेत. कवितानं हातात डमरू असणाऱ्या भोलेनाथचा टॅटूही फ्लाँट केला. ड्रेसरवरही तिनं खास वक्तव्य केलं.

फोटो शेअर करताना कविता आपल्या कॅप्शनमध्ये म्हणाली, “बोलो हर हर हर महादेव की जय. मी शांत नाही राहू शकत कारण महाशिवरात्री येत आहे. या ब्लाऊजसाठी वीणा तुझे आभार. याचा रंग भगवान शंकरांनी जे विष प्राशन केलं होतं त्यासारखाच आहे.”

कवितानं पतीसोबतही काही फोटो शेअर केले आहेत आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कवितानं लिहिलं की, “सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम.”

View this post on Instagram

I love you all ❤️

A post shared by Kavita (@ikavitakaushik) on

कवितानं टॅटू दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तिनं बॅकसाईटचे काही फोटो शेअर केले होते. कविता अध्यात्माकडून खूपच प्रेरीत आहे. ती रोज योग आणि प्राणायम करते. याचे फोटोही ती शेअर करत असते.

View this post on Instagram

Wasn’t me 🤐

A post shared by Kavita (@ikavitakaushik) on

 

 

You might also like