Bigg Boss 14 : वडिलांची आठवण आल्याने इमोशनल झाली ‘दबंग’ स्टार कविता कौशिक

नवी दिल्ली : टीव्हीवर टफ कॉप चंद्रमुखी चौटालाची भूमिका करणारी अभिनेत्री कविता कौशिक रियल लाइफमध्ये सुद्धा रफ अँड टफ आहे. तिचा बिनधास्तपणा, तिच्या बोलण्यातून आणि अ‍ॅक्शनमधून स्पष्ट जाणवतो. नुकतीच कविताने बिग बॉस 14 च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. घरात येताच तिला कॅप्टनशीप सुद्धा मिळाली आणि ती चांगली खेळतही आहे. परंतु, घरात एक असा क्षण आला जेव्हा कठोर दिसणारी कविता इमोशनल झाली.

कविता, जस्मिन भसीन आणि राहुल वैद्यसोबत बोलत असताना तिला तिच्या वडिलांची आठवण आली. चर्चेत कविताने आपल्या दिवंगत वडिलांबाबत सांगितले, आणि आपल्या आयुष्यावरील त्यांच्या प्रभावाबाबत सुद्धा सांगितले. कविताने चंद्रमुखी चौटालामध्ये आपली भूमिका आणि अ‍ॅक्शनवर म्हटले, ते जसे मी करत होते ना, जशी माझी बॉडी लँग्वेज होती, ती खुप रियल होती कारण मी संपूर्ण वडिलांना कॉपी केले होते. ती फीमेल व्हर्जन होती दिनेश चंद्र कौशिक यांची.

वडिलांच्या या गोष्टीचा केला उल्लेख  

आपल्या वडिलांची आठवण काढताना ती म्हणाली, खुप वेगळे होते ते. ते जवळपासच आहेत, मी त्यांना अनुभवते. ते गेल्यानंतर माझ्यात खुप बदल झाले. जर काही खराब झाले तरी मी विचार करत होते की, मी काय चूक केली? सर्वात मजबूत माणूसच सर्व करू शकतो, इनर एजर्नी आणि सेल्फ-इम्प्रूव्ह.

बिग बॉसमध्ये आल्यानंतर कविताने सलमान खानला चंद्रमुखी चौटालाच्या रोलबाबत सांगितले होते. तिने हिच गोष्ट त्यावेळी सुद्धा सांगितली जेव्हा वडिलांची आठवण काढली होती आणि या रोलमध्ये वडिलांना कॉपी केल्याचे म्हटले.

You might also like