TV अभिनेत्री कविता कौशिकच्या बिकीनी फोटोमुळं सोशलवर ‘राडा’, वातावरण झालं ‘गरम’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीची चंद्रमुखी चौटाला म्हणून प्रसिद्ध असलेली कविता कौशिक बोल्डनेसमध्ये सर्वात पुढे आहे यात काही शंका नाही. तिचे व्यक्तिमत्त्व खूप वेगळे आहे आणि त्यासाठी ती खूप मेहनतही करते.

अभिनेत्री कविता कौशिल ही केवळ तिच्या अभिनयासाठीच ओळखली जात नाही तर ती सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे चर्चेत देखील असते. ती अतिशय स्ट्रिक रूटीन फॉलो करते. योगापासून ते व्यायामापर्यंत ती सर्व काही करते आणि तिच्या फिटनेसने लोकांना प्रेरितही करत असते.

या अभिनेत्रीने नुकताच व्यायाम करताना खास पोजमध्ये एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तिने बिकिनी घातली आहे. त्याचबरोबर तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एक चांगली व्यक्ती व्हा पण आपण एक चांगली व्यक्ती आहात हे सिद्ध करण्यासाठी आपला वेळ कधीही वाया घालवू नका. लोक आपल्याला केवळ त्यांच्या मर्यादेपर्यंत त्रास देऊ शकतात परंतु ते आपल्या अस्तित्वापर्यंत पोहोचू शकत नाहीत.’

कविता कौशिक तिच्या इन्स्टाग्रामवर योगा करताना अनेकदा फोटो शेअर करत असते. चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंतीस पडतात. कविता कौशिक सध्या टीव्ही सीरियल ‘सावधान इंडिया’ ला होस्ट करीत आहे. कविताने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही सीरियल ‘कुटुंब’ पासून केली होती. पण तिला जास्त प्रसिद्धी ‘F.I.R.’सीरियलमधून मिळाली होती. यामध्ये तिने एक बोल्ड पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली होती. ही एक कॉमेडी सीरियल होती. या व्यतिरिक्त तिने बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमध्येही आपला जलवा दाखविला आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/