मिलिंद सोमनचा पब्लिक प्लेसमधील ‘न्यूड’ फोटो पाहून थक्क झाली अभिनेत्री कविता कौशिक ! दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन यानं नुकताच त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानं सोशलवरून समुद्रकिनारी धावताना न्यूड फोटो शेअर करून चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलं. यानंतर सर्वांनीच त्याचं कौतुक केलं. त्याचे फीमेल फॅन्सही त्याला असं पाहून थक्क झाले. यावर आता अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) हिनं प्रतिक्रिया दिली आहे.

मिलिंद सोमन यांनी ट्विटरवरून शेअर केलेला फोटो कवितानं रिट्विट केला आहे. या सोबत तिनं लिहिलं की, यामुळंच मला ट्विटर आवडतं.

मिलिंदच्या फीमेल चाहत्यांमध्ये कविताचाही समावेश आहे. कवितानं शेअर केलेलं ट्विट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहत.

मिलिंदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या फोर मोर शॉट्स प्लिज या वेब सीरीजच्या दोन्ही सीजनमध्ये तो झळकला होता. मिलिंदनं करिअरची सुरुवात मॉडेलिंगनं केली होती.

कविताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच तिची डू नॉट ड्रीम ही शॉर्ट फिल्म रिलीज आहे. अभिनव शुक्ला डायरेक्टेड या सिनेमाचं एडिटींगपासून तर प्रॉडक्शनपर्यंतचं सर्व काम कविताचा पती रोनित बिस्वास यानं सांभाळलं आहे. ही एक 13 मिनिटांची हॉरर फिल्म आहे. कविता घरीच याची शुटींग केली आहे. एकता कपूरच्या कुटुंब या मालिकेतून तिनं टीव्ही इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. परंतु एफआयआर या मालिकेतील चंद्रमुखी चौटाला या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. एफआयआर या मालिकेव्यतिरीक्त कवितानं कहानी घर घर की, रात होने को है, तुम्हारी दिशा, सीआयडी यांसारख्या अनेक मालिकेत काम केलं आहे. अलीकडेच ती बिग बॉस 14 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत आली होती. परंतु लवकरच तिला बाहेर पडावं लागलं.