काय सांगता ! होय, ‘या’ देशात जास्त मुलांना जन्म दिला तर मिळतं ‘सुवर्ण पदक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज जगात अनेक देश आहेत ज्याची लोकसंख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. त्यामुळे अशा देशात लोकसंख्येला आळा घालण्यासाठी काही नियम आणि कायदे केले आहेत. परंतू एक असा देश आहे ज्या देशाला आपल्या देशात जास्त मुलं जन्माला यावी असे वाटते आणि ते त्यासाठी महिलांना पुरस्कार देऊन प्रोस्ताहन देखील देतात. हा असा देश आहे जेथे महिलांनी अधिक मुले जन्माला घातली तर त्यांना ‘सुवर्ण पदक’ दिले जाते.

‘कजाखस्तान’ हा असा देश आहे जेथे लोकसंख्या कमी असल्याने वाढवण्यासाठी उपाय योजना आखल्या जात आहे. त्यामुळे कजाखस्तान सरकारने मोठ्या कुटूंबाला प्रोस्ताहन देण्यास सुरुवात केली आहे. येथील सरकारच्या मते एका कुटूंबात जास्तीत जास्त मुले असावीत ज्यामुळे लोकसंख्या वाढीला हातभार लागेल. लोकसंख्या वाढीला हातभार लावणाऱ्या महिलांचा ‘हीरो मदर्स’ हे पदक देऊन सन्मान करण्यात येतो.

जर एखाद्या महिलेने किमान सहा मुलांना जन्म दिला असेल तर त्यांना रौप्य पदक देण्यात येते. सातपेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या महिलांना सुवर्ण पदकाने भूषवले जाते. तर मुलांच्या संभाळाला हातभार म्हणून सरकारकडून महिलेला आयुष्यभर महिन्याला भत्ता मिळतो. शिवाय मुलांना सरकारी नोकरीत सवलत देखील देण्यात येते.

आई असलेल्या महिलांचा सन्मान करण्याची त्यांना आर्थिक मदत देऊ करण्याची प्रथा सोवियत संघ अस्तित्वात असल्यापासून सुरु आहे. सोवियत संघाने 1944 साली ‘मदर हिरोइन’ हा किताब देऊन महिलांना सन्मानित केले होते. हा पुरस्कार त्या महिलेला मिळायच्या ज्यांच्या कुटूंबात 10 पेक्षा जास्त मुले आहेत. एवढ्या वर्षानंतर आता लोकसंख्या वाढीसाठी कजाखस्तानने पुढाकार घेतला आहे.

Visit : Policenama.com