मुली उंच टाचेच्या सॅन्डल का घालतात असं बिग बी अमिताभनं विचारलं, उत्तर ऐकून बच्चनची बोलती बंद (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘कोन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात आज प्रसारित होणाऱ्या आजच्या भागाचा प्रोमो समोर आला असून यामध्ये आज दोन स्पर्धक हॉटसीटवर बसणार असून यामध्ये अमिताभ बच्चन त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत.

आजच्या भागात सहभागी होणाऱ्या महिला स्पर्धकाला महिला High Heels का घालतात असा प्रश्न विचारला असता उत्तर ऐकून अमिताभ बच्चन देखील आपले हसू आवरू शकले नाहीत.

अमिताभ यांनी हा प्रश्न विचारला असता एका प्रेक्षकाने त्यांना विचारले कि, जया बच्चन घालत नाहीत का ?त्यावेळी वातावरण हलके होऊन सर्वजण हसायला लागले. त्यावेळी अमिताभ यांनी देखील त्या High Heels नाही तर शिडी घालतात असे मजेशीर उत्तर दिले. यावर प्रेक्षकांनी देखील हसत त्यांना दाद दिली. कालच्या भागात झारखंडची दीप ज्योति हिने 25 लाख रुपये जिंकले.

यावेळी खेळताना तिला 50 लाख रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला कि, जमशेदजी नुसीरवानजी टाटा यांनी स्थापन केलेल्या बेंगळुरूमधील भारतीय विज्ञान संस्थेचे पहिले निर्देशक कोण होते? यासाठी तिला दोराबजी टाटा,सीवी रमन, होमी जहांगीर भाभा, सतीश धवन असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र तिला या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते. त्यामुळे तिने खेळ थांबवण्याचा निर्णय घेत 25 लाख रुपये जिंकले.

दरम्यान, हा प्रश्न सोडताना तिने या प्रश्नाचे उत्तर हे सतीश धवन असे दिले मात्र याचे उत्तर सीवी रमन असे होते. त्यामुळे तिने जर चुकीचे उत्तर दिले असते तर तिला केवळ 3 लाख 20 हजार रुपयांवर समाधान मानावे लागले असते.

visit : Policenama.com