‘बिग बी’ अमिताभनं ‘या’ स्पर्धकाचं ठेवलं ‘भारी’ नाव ‘अधमुंड’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात मंगळवारी नितिन कुमार पटवा हा स्पर्धक हॉटसीटवर बसला होता. या दरम्यान अमिताभ बच्चन आणि स्पर्धक नितीन पटवा यांनी खूप गप्पा मारल्या.

मध्यप्रदेशच्या जबलपूर मधील नितीनचे वडील खासगी नोकरी करत असून आई गृहिणी आहेत. नितीनची आई सुरुवातीला एक कॉस्मेटिकचे दुकान चालवत होती. मात्र आरोग्यामुळे त्यांना ते पुढे करता आले नाही. त्याचबरोबर अमिताभ यांनी नितीन पटवा याच्याशी गप्पा मारताना त्याच्या केसांच्या स्टाइलविषयी त्याच्याशी गप्पा मारल्या. त्याने चारी बाजूने केस कापले होते आणि मध्येच केस शिल्लक ठेवले होते. त्यावरून अमिताभ यांनी त्याची खिल्ली उडवत त्याला एक टोपण नाव दिले. त्यावेळी अमिताभ यांनी त्याला ‘अधमुंड’ असे नाव दिले. कारण त्याने आपल्या अर्ध्या डोक्यावरची केस कापले होते आणि अर्ध्या डोक्यावर तसेच होते.

त्याचबरोबर त्यांनी नितीनला त्याच्या पटपट बोलण्याच्या सवयीमुळे दुसरे टोपणनाव देत ‘गतिशील’ असे नाव दिले. त्याचबरोबर त्याने या खेळात किती रक्कम जिंकली आहे हे आजच्या भागात स्पष्ट होईल.

आरोग्यविषयक वृत्त –