‘या’ कारणामुळं अमिताभ बच्चन उशीखाली बूट ठेऊन झोपत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोनी टीव्हीवरील कोन बनेगा करोडपती या कार्यक्रमात मंगळवारी झालेला भाग फारच चर्चेत असून या भागात अमिताभ यांनी स्पर्धकांची चांगलीच टांग खेचत त्यांच्याशी गप्पा देखील मारल्या. मध्यप्रदेशच्या नितिन कुमार पटवा हा स्पर्धक हॉटसीटवर बसला होता. या दरम्यान अमिताभ बच्चन आणि स्पर्धक नितीन पटवा यांनी खूप गप्पा मारल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रातील धुळ्याच्या हेमंत याच्याबरोबर देखील अमिताभ यांनी खूप गप्पा मारल्या. त्याचबरोबर आपले अनेक किस्से स्पर्धकांना सांगितले.

हेमंत यांनी आपल्या कुटुंबियांशी आपले खास नाते असल्याचे सांगितले. त्याचवेळी अमिताभ यांनी त्यांना ‘हसमुख’ नाव दिले. त्यांच्या सतत हसत राहण्याच्या स्वभावामुळे त्यांना अमिताभ यांनी हे नाव दिले. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आजीबरोबर राहता का प्रश्नावर हेमंत यांनी होकार देताच अमिताभ म्हणाले कि, आजकाल खूप कमी कुटुंबातील मुलांना आपल्या आजी आजोबांचा सहवास लाभतो. त्याचबरोबर हेमंत यांनी आपल्या लहानपणीच्या अनेक आठवणी सांगत सर्वांना भावुक केले. त्याचबरोबर आजच्या भागात तुम्हाला हे सर्व पाहायला मिळणार आहे.

दरम्यान,  हेमंत यांच्या लहानपणीच्या आठवणीवर भावुक झालेल्या अमिताभ यांनी देखील आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. जर एखादी गोष्ट त्यांना आवडली तरी ते आपल्या आईवडिलांना सांगत नसत, मात्र जर त्यांनी ते घेऊन दिले तर त्या बुटांना ते रात्री उशीखाली घेऊन झोपत असत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like