KBC – 11 : 50 लाखाचा प्रश्न ऐकताच सोडला शो, 25 लाख जिंकले तरी देखील घरचे रागावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोन बनेगा करोडपतीचा 11 वा सीजन सध्या सुरु आहे, या कार्यक्रमात चर्चा असते ती कोणता स्पर्धेक हॉट सीटवर आहे आणि त्याला कोणता प्रश्न विचारण्यात आल्यावर त्याने गेम सोडला. गुरुवार केबीसी मध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर स्पर्धेक होते ते अभिषेक झा. त्यांनी उत्तम खेळत 50 लाखांसाठीच्या प्रश्नाचे उत्तर येत नसल्याने 25 लाखांवर गेम सोडला. परंतू 25 लाख रुपये जिंकून देखील त्यांना त्यांच्या घरच्यांचा संताप सहन करावा लागला.

विचारण्यात आला होता 50 लाखांसाठीचा प्रश्न 
अभिषेक झा यांनी विचारण्यात आलेला प्रश्न होता की, जगभरात फिरणाऱ्या पहिल्या सोलर उर्जेवर चालणारे विमानाचे नाव काय, ज्याने 2016 साली आपली फेरी पूर्ण केली ?
या प्रश्नाचे योग्य उत्तर होते सोलर इंपल्स टू. परंतू अभिषेक या प्रश्नावर आडखळले. परंतू गेम सोडून घरी गेल्यानंतर त्यांना घरच्यांचा ओरडा खावा लागला.

अभिषेक यांनी 25 लाख रुपये जिंकले तरी त्यांच्या घरचे नाराज होते. घरच्यांचे म्हणणे होते की लाइफ लाइन असताना गेम अर्धवट का सोडला. अभिषेक 1 ऑक्टोबरला हॉट सीटवर बसले होते परंतू 2 ऑक्टोबरला कर्मवीरचा स्पेशल एपिसोड असल्याने त्यांचा गेम 3 ऑक्टोबर पर्यंत चालला.

केबीसीचा पुढील एपिसोड बुधवारी 9 ऑक्टोबरला होता, यात झारखंडची एक मुलगी 25 लाख रुपयांपर्यंत पोहचली, तीने 8 ऑक्टोबरला आपल्या चारही लाइफ लाइनचा वापर केला होता. त्यानंतर ती 12.50 लाख रुपये घेऊन बाहेर पडली.

visit : policenama.com 

Loading...
You might also like